सामाजिक

रोटरी क्लब ऑफ केजकडून ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त पाणी व फळांचे वाटप; छत्रपती शिवाजी महाराज चौकात उमटला सामाजिक सलोख्याचा गोडवा!

रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त पाणी व फळांचे वाटप; सामाजिक सलोख्याचे दर्शन
केज (प्रतिनिधी):
ईद-ए-मिलादुन्नबी सणाच्या निमित्ताने शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीदरम्यान रोटरी क्लब ऑफ केज (डिस्ट्रिक्ट ३१३२) च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुस्लिम बांधवांसाठी पाणी आणि फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून शहरात सामाजिक ऐक्य व सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला.
‘जश्ने-ए-ईद मिलादुन्नबी’च्या पवित्र पर्वावर आयोजित या उपक्रमात रोटरी क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मिरवणुकीतील भाविकांचे व नागरिकांचे स्वागत करत त्यांना पिण्याचे पाणी आणि ताजी फळे वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या. रोटरी क्लब नेहमीच सामाजिक उपक्रमांत अग्रेसर राहून ‘Create Lasting Impact’ या ध्येयाने काम करत असल्याचे या वेळी उपस्थितांनी नमूद केले.
उपक्रमात उपस्थित मान्यवर व सदस्य:
या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ केजचे अध्यक्ष असरार खुरेशी, सचिव हनुमंत भोसले सर, डॉ. दिनकर राऊत, प्रविण देशपांडे, सत्यवान राऊत, विकास मिरगणे, हारून इनामदार, सिताताई बनसोड, सुर्यकांत चवरे, विनोद शिंदे, महेश जाजू, श्रीराम देशमुख, दादा जमाले पाटील, बापूराव शिंगन, अरुण अंजाण, डॉ. ईश्वर महाकुंडे, जितेंद्र देवधारे, बाप्पासाहेब वाळके, शेख इक्बाल शेख यांच्यासह रोटरी क्लबचे इतर सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाचे शहरातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button