राजकारण

केजच्या मतदाराने निवडून दिले विश्वासाने, यांनी सोडले वाऱ्यावर! निष्ठा विकून घटनात्मक पदांवर बसण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे दुर्भाग्यपूर्ण राजकारण!

मतदारांचे थोर नशीब! पाच वर्षे वाऱ्यावर सोडणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता निवडणुकीच्या तोंडावर आली जनतेची आठवण!

केज नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२७: राजकीय समीकरणांची उलथापालथ, ‘राजकीय सोयी’च्या युतीमुळे नागरिक सावध!

केज:केज नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वेध स्थानिक नेतेमंडळींना लागले असून शहरातील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. गेल्या साडेचार वर्षांत घडलेल्या राजकीय घडामोडी, पक्षांतरे आणि आघाड्यांच्या खेळामुळे २०२७ ची नगरपंचायत निवडणूक चुरशीची आणि तितकीच अनपेक्षित वळणे घेणारी ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मागील निवडणुकीतील गणित आणि धक्कादायक निकाल

मागील निवडणुकीत काँग्रेसच्या गोटात ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक दादा पाटील, खा. रजनीताई पाटील, युवा नेते आदित्य पाटील, ज्येष्ठ नेते प्रकाश सेठ भन्साळी, राहुल सोनवणे, मौला सौदागर, कबीर इनामदार शकीलभाई इनामदार, प्रवीण शेप, अंगद गुंड, अरुण गुंड, कविताताई कराड, पशुपतीनाथ दांगट, अमर पाटील, कपिल मस्के, समीर देशपांडे, लक्ष्मण जाधव, दिनकर राऊत, बाळासाहेब ठोंबरे, भैया शिंदे आदी मंडळी सक्रिय होती.

दुसरीकडे जनविकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष हारूणभाई इनामदार, ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर, अंकुशराव इंगळे, युवराज काळे, दामू देव, सुग्रीव कराड, दिलीपराव गुळभिले, हनुमंतराव भोसले तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून खा. बजरंग बप्पा सोनवणे, ज्येष्ठ नेते रणजितसिंह पाटील, बाळासाहेब जाधव, भाऊसाहेब गुंड, बाळासाहेब गाडवे, युनूसभाई शेख, सय्यद शरीफ, सागर डिकुळे, गणेश खराडे, सद्दू खतीब, अजहर इनामदार आदींनी ताकद लावली होती.

त्यावेळी खा. रजनीताई पाटील व खा. बजरंग बप्पा सोनवणे यांच्यातील मतभेदांचा थेट फायदा जनविकास आघाडीला झाला. १० वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेसविरोधात जनविकास आघाडीने मुसंडी मारत १७ पैकी तब्बल ८ जागा जिंकल्या. काँग्रेसला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादीने ५ जागा जिंकल्या आणि एक जागा अपक्ष ओम रांजणकर यांच्या पारड्यात गेली.

सत्तेसाठी काँग्रेस-जनविकास आघाडीची हातमिळवणी

निवडणूक विरोधात लढल्यानंतरही सत्तास्थापनेसाठी जनविकास आघाडी (८) आणि काँग्रेस (३) एकत्र आले. या ११ सदस्यांच्या जोरावर सौ. सीताताई बनसोड यांची नगराध्यक्षपदी तर सौ. शीतलताई दांगट यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. गेल्या साडेचार वर्षांपासून हीच सत्ता केज नगरपंचायतीचा कारभार पाहत आहे.

लोकसभेनंतर बदललेली समीकरणे व पक्षांतराचे वारेबीड लोकसभा निवडणुकीत खा. बजरंग बप्पा सोनवणे यांच्या विजयानंतर केजचे स्थानिक राजकीय संदर्भ पूर्णतः बदलले.

 खा. रजनीताई पाटील यांच्यावर निष्ठा ठेवून दीर्घकाळ सत्ता भोगलेल्या काँग्रेसच्या अनेक प्रमुख शिलेदारांनी आता खा. बजरंग बप्पा सोनवणे यांच्या गोटात जाण्याची तयारी सुरू केली आहे.

 जनविकास आघाडीचे संस्थापक हारूणभाई इनामदार आणि ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

 यामुळे काँग्रेस आणि स्थानिक आघाड्यांची मोठी पीछेहाट झाली असून पक्षीय निष्ठा पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत.

विरोध शून्यावस्था आणि ‘राजकीय सोयी’चा कारभार

गेल्या साडेचार वर्षांच्या काळात नगरपंचायतीच्या कारभाराविरोधात एकाही पक्षाच्या नगरसेवकाने तीव्र आंदोलन, मोर्चा किंवा तक्रार केल्याचे दिसले नाही. सर्वच पक्षांचे स्थानिक कारभारी सत्तेत ‘गुण्यागोविंदाने’ नांदल्याचे चित्र राहिले. त्यामुळे निवडणुका तोंडावर आल्यावर एकमेकांवर टोकाची टीका करणारे नेते निकालांनंतर स्वार्थासाठी कधीही एकत्र येऊ शकतात, हाच इतिहास राहिला आहे.

नागरिकांनी भावनेच्या भरात वाहून जाऊ नये

नेत्यांच्या या सोयीच्या राजकारणामुळे केजमधील सामान्य मतदार व कार्यकर्त्यांनी आपापसांत वैयक्तिक पातळीवर जाऊन वैर घेऊ नये, अशी चर्चा शहरात सुरू आहे. आज एकमेकांचे कट्टर वैरी भासवणारे नेते सत्तेसाठी कधी एकत्र येतील आणि कार्यकर्त्यांचा राजकीय ‘काटा’ काढतील याचा काहीही नेम नाही. त्यामुळे २०२७ च्या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला मिळतो आणि कोणती नवी युती आकाराला येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

या केज नगरपंचायत मधे कशाच्या आधारावर राजराज्य अवतरले होते त्यांची पन आर्थिक यादी लवकरच प्रदर्शित होणार

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button