Uncategorized

केजमधील ‘हॉटेल बसंत विहार’चे संस्थापक नारायण मेहता यांचे वृद्धापकाळाने निधन; संघर्षातून उभा केला होता मोठा व्यवसाय

क्रांतीसूर्य न्यूज / केज:

केज शहरातील नामांकित व प्रसिद्ध ‘हॉटेल बसंत विहार’चे संस्थापक नारायण मेहता (वय ९० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने काल रात्री केज येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने केज शहरासह व्यापारी वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

राजस्थान ते केज : कावडीने पाणी भरण्यापासून सुरू झालेला संघर्ष

मूळचे राजस्थानचे असलेले नारायण मेहता हे साधारण १९५० च्या दशकात केज शहरात आले आणि तेव्हापासून ते केजचेच सुपुत्र होऊन राहिले. सुरुवातीच्या काळात केज शहरात पाण्याचे भीषण दुर्भिक्ष होते. त्या अत्यंत खडतर परिस्थितीत मेहता यांनी अनेक घरांमध्ये कावडीने पाणी भरून कष्टाने आपली उपजीविका चालवली. प्रामाणिक कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी १९६२ मध्ये ‘हॉटेल बसंत विहार’ची स्थापना केली.

उत्कृष्ट चव आणि ग्राहकांशी आपुलकीचे नाते जपत त्यांनी या व्यवसायाचा विस्तार केला. आज बसंत विहारच्या चौथ्या पिढीपर्यंत हा व्यवसाय मोठ्या दिमाखात पोहोचला असून शहराच्या व्यावसायिक ओळखीचा तो एक अविभाज्य भाग बनला आहे. मेहता यांनी शून्यातून उभा केलेला हा प्रवास नव्या पिढीतील व्यावसायिकांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे.

त्यांच्या पश्चात जगन्नाथ मेहता, संजय मेहता आणि राजू मेहता ही तीन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा आणि सुविद्य परिवार आहे.

उद्या मूळ गावी अंत्यसंस्कार

स्व. नारायण मेहता यांचे पार्थिव त्यांच्या मूळ जन्मगावी अदकालीया (राजस्थान) येथे नेण्यात येणार असून, उद्या दुपारी ४ वाजता तेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कष्ट, प्रामाणिकपणा आणि सातत्याचे प्रतीक असणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाला ‘क्रांतीसूर्य न्यूज’ परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button