क्राईम

वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापुर कोर्टात पोस्को अंतर्गत खाजगी फिर्याद दाखल

मॅनेजरच्या मुलीचे अपहरण करुन लैगिंक छळ केल्याचा आरोप

सोलापूर -: वाल्मिक कराडच्या मुलगा सुशील वाल्मीकराव कराड, व त्यांचे दोन मित्र अनिल रावसाहेब मुंडे व गोपी गंजेवार यांनी वाल्मिक कराडच्या मॅनेजरच्या अज्ञान मुलींचे घरात घुसून अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देवून तिचा विनयभंग करून पोक्सोच्या कलम 8 व 12 अन्वये लैंगिक छळ केला. परंतु, वाल्मिकी कराडच्या दहशतीमुळे व राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांनी पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यात फिर्याद दाखल करून घेतली नाही. त्यामुळे पीडितेने BNNS चे कलम 175 /3 नुसार सोलापूर जिल्हा न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीने IPC चे कलम 307, 326, 329, 354, 364, 379, 392, 452, 506, 511 सह 34 आणि पोक्सोचे कलम ८ व १२ नुसार सुशील वाल्मिक कराड व अन्य २ यांचे विरूध्द कोर्टात गुन्हा दाखल केला आहे. या खाजगी गुन्ह्यात BNSS च्या नवीन कायद्यानुसार आरोपींचे म्हणणे घेणेसाठी समन्स जारी झाले असून पुढील तारीख उद्याच म्हणजे दिनांक १८ डिसेंबर २०२४ आहे.
निव्वळ योगायोग  वाल्मिकी कराडच्या मुलाने अपहरण करून लैंगिक छळ केलेली पिडित मुलगी OBC समाजाची आहे. तर ज्या कोर्टात सदरची खाजगी फिर्याद दाखल केली आहे. त्या कोर्टाचे जज हे वाल्मिकी कराडचे नातेवाईक आहेत. त्यामुळे या खाजगी फिर्यादीत गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्ट कधी देईल, याची वाट पहावी लागेल. या गुन्ह्यासाठी वाल्मिकी कराडच्या मुलांच्या सोलापूर कोर्टात वाऱ्या मात्र चालू झाल्या आहेत.
विशेष सूचना फिर्याद दाखल करणारी लहान मुलगी असल्याने तिची ओळख किंवा नाव वगैरे कुणीही उघड करू नये, ही विनंती.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button