क्राईम
घरकुलाचे पैसे खाणारे भडवे, आता कर्मचाऱ्याच्या जिवाला झाले कडवे; घरकूल घोटाळा प्रकरणी केज नगरपंचायतीत पहिला बळी!
घरकूल घोटाळ्याने घेतला बळी; चौकशीच्या धास्तीने कर्मचाऱ्याचा अंत!

केज (प्रतिनिधी):सगळं काही सुरळीत सुरू होतं… दोन मुली आणि एका मुलाचं लग्न होऊन सुखाचा संसार थाटलेला. केज नगरपंचायतमध्ये हक्काची नोकरी, चांगला मित्रपरिवार आणि सुसंस्कारी मुलं-बाळी… अशा एका चांगल्या चाललेल्या हसतखेळत्या जीवनात अचानक काळानं घाला घातला. केज नगरपंचायतीमधील बहुचर्चित घरकुल घोटाळ्याच्या चौकशीच्या धास्तीने अखेर कर्मचारी भीमराव मस्के यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे केज शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून, “बड्या माशांनी कोट्यवधींचे ‘शेन’ खाल्ले आणि निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी घेतला,” अशी संतप्त भावना नागरिकांमधून उमटत आहे.
गरिबांच्या घरांवर दरोडा अन् कर्मचाऱ्यांना आमिष!
काही वर्षांपूर्वी लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात केजच्या राजकारणात काही स्वार्थी आणि भ्रष्ट प्रवृत्तींचा उदय झाला. गोरगरीब, निराधारांच्या हक्काच्या घरकुलाचा तब्बल ३ ते ४ कोटी रुपयांचा निधी या भ्रष्टाचाऱ्यांनी संगनमताने लाटला. हा घोटाळा करत असताना या सराईत गुन्हेगारांनी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना ढाल बनवले. भीमराव मस्के यांच्यासारख्या कर्मचाऱ्यांच्या नावावर लाखो रुपयांचे धनादेश उचलण्यात आले. या कर्मचाऱ्यांना अवघे १०-१० हजार रुपयांचे आमिष दाखवून त्यांच्या सह्या घेतल्या गेल्या आणि पडद्यामागच्या सूत्रधारांनी स्वतःचे खिसे कोट्यवधी रुपयांनी गरम केले.
आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी अन् अटकेची धास्ती
हा कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी गुन्हे दाखल झाले. सध्या या गुन्ह्याचा तपास बीडच्या आर्थिक गुन्हे शाखे कडे (EOW) वर्ग करण्यात आला आहे. पोलीस चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागल्याने आणि “आपल्याला अटक होईल” या भीतीने ग्रासलेले भीमराव मस्के हे काही दिवसांपूर्वी नातेवाईकांच्या घरी राहण्यासाठी गेले होते. परंतु, याच अटकेच्या आणि बदनामीच्या प्रचंड धास्तीने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
घोटाळेबाज उजळ माथ्याने फिरतात; ‘अध्यक्ष’ होण्याचे आखाडे!
एकीकडे एका गरीब कर्मचाऱ्याला लाखाच्या आत पैसे देऊन त्याच्या हसत्याखेळत्या संसारावर नांगर फिरवणारे मुख्य सूत्रधार मात्र अजूनही मोकाट आहेत. कोट्यवधींचा घोटाळा करूनही या मंडळींना ना लाज उरली आहे ना शरम! हे पापी लोक आजही केज शहरात उजळ माथ्याने फिरत असून, “आता नगरपंचायतीचा अध्यक्ष मी कसा होईल?” याचे राजकीय आखाडे बांधत फिरत आहेत.



