आपला जिल्हा

साठे चौक ते माळवेस दरम्यान अवैध हातगाडे लावल्यास होणार कायदेशीर कारवाई; पोलीस निरीक्षक वैभव पाटील

बीड:-साठे चौक ते माळवेस दरम्यान रस्त्यावर अवैधपणे हातगाडे लावणाऱ्या चालकांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बीड शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी आज सर्व हातगाडे चालकांना बोलावून माणुसकीच्या नात्याने थेट कारवाई न करता, गुलाबपुष्प देऊन कायदा पाळण्याचे आवाहन केले. तसेच यापुढे रस्त्यावर गाडे लावल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.
…तर कायदाही पाळलाच पाहिजे: पोलीस निरीक्षक वैभव पाटील
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी सांगितले की, “हातगाडे चालक कष्टाने आपली भाकरी कमवत आहेत, त्यांच्या या कष्टाबद्दल पोलीस प्रशासनाला पूर्ण आदर आहे. परंतु, पोट भरत असताना त्यांनी कायद्याचे देखील पालन केले पाहिजे. सार्वजनिक रस्ता हा वाहनांच्या आणि नागरिकांच्या येण्या-जाण्यासाठी असतो. तिथे गाडे किंवा विक्रीचे सामान लावल्याने पादचाऱ्यांना अडथळा होतो.”
अपघात अन् वाद टाळण्यासाठी पाऊल
रस्त्यावरील गर्दीमुळे किरकोळ धक्का लागल्यास मोठे वाद किंवा दंगल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावरकर चौक, साठे चौक ते माळवेस या मार्गावर कोणत्याही चालकाने रस्त्यावर अडथळा होईल असा गाडा, ठेला किंवा टोपली लावू नये, अशा कडक सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

नगरपरिषदेला दिले पत्र
वाहतुकीला अडथळा ठरणारे हे अतिक्रमण कायमस्वरूपी हटवण्यासाठी आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी बीड वाहतूक शाखेच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला देखील अधिकृतपणे कळवण्यात आले आहे.

यापुढे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक शाखेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे हातगाडे चालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button