सामाजिक

प्रेमळ आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड; सौ. कल्पनाताई चाटे यांना अश्रूपूर्ण निरोप

प्रशासकीय व सामाजिक वर्तुळात हळहळ;

अंबाजोगाई कार्यकारी अभियंता देवीदासराव चाटे यांच्या पत्नी कल्पना चाटे यांचे निधन

केज तालुक्यात शोककळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

केज (प्रतिनिधी):अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवीदासराव चाटे यांच्या पत्नी सौ. कल्पना देवीदासराव चाटे यांचे सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी संभाजीनगर येथे पार पडला यांच्या आकस्मिक जाण्याने चाटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, केज परिसरासह आप्तेष्ट आणि मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
स्व. कल्पना चाटे या अत्यंत प्रेमळ, शांत आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. सर्वांशी आपुलकीने संवाद साधणाऱ्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या लीलया पेलणाऱ्या व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने चाटे कुटुंबाने एक आधारवड गमावला आहे.
त्यांच्या पश्चात पती कार्यकारी अभियंता देवीदासराव चाटे, मुलगी उपविभागीय अधिकारी (SDO) नम्रता चाटे, मुलगी ॲड. अमिता चाटे, मुलगा ॲड. संकेत चाटे, सून, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्याचप्रमाणे, त्या केज तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ठोबरे यांच्या ज्येष्ठ भगिनी होत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, विधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी निवासस्थानी भेट देऊन चाटे व ठोबरे कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि दिवंगत कल्पना चाटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button