संपादकीय

सत्तेची मस्ती की जमिनीची हाव? स्वतः ५० कोटींचे धनी, तरीही कोर्टात सहानुभूतीसाठी एका वृद्ध महिलेवर गुंडगिरीचा खोटा आळ!

दाव्यातून बदनामीचा खेळ उघड! केज नगरपंचायतीशी संबंधित नेत्यांकडून सत्तेचा गैरवापर; निष्पाप नागरिकांवर बनावट आरोपांचे अस्त्र?

‘उलटा चोर कोतवाल को डांटे!’; कोट्यवधींच्या मालमत्तांचे धनी असणाऱ्यांचाच ७० वर्षांच्या वृद्धेवर ‘गुंड-धनदांडगे’ असल्याचा खोटा शिक्का!
स्वतःच्या २०१६ च्या खरेदीखतात रस्त्याचे मोजमाप नसताना इतरांवर खोटे आरोप; बाजार समितीचे माजी संचालक व सत्ताधाऱ्यांकडूनच सत्तेचा आणि संपत्तीचा गैरवापर असल्याचा संशय
विशेष बातमी प्रतिनिधी / केज (जि. बीड):
केज शहरातील सर्वे नंबर १०९/अ मधील जमिनीच्या वादावरून दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दाव्यामागे जमिनीचा वाद कमी आणि राजकीय चिखलफेकच जास्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. जनविकास आघाडीचे मार्गदर्शक, नगरपंचायतीच्या सत्तेशी संबंधित व केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे हमाल-मापाडी प्रतिनिधी राहिलेले वादी स्वतः कोट्यवधींच्या मालमत्तांचे धनी असताना, उलट एका ७० वर्षांच्या वृद्ध महिलेसह सामान्य नागरिकांवरच त्यांना ही जमीन विक्री केली नाही म्हणून  ‘धनदांडगे व गुंड’ असा शिक्का मारून न्यायालयाची आणि जनतेची दिशाभूल करत असल्याचा सूर आता उमटू लागला आहे.
७० वर्षांच्या वृद्धेवर ‘गुंड, धनदांडगे व आडदांड’ असा शिक्का; हा कसला न्याय?
या दाव्यातील सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे, प्रतिवादी क्र. १ असलेल्या विजया सिताराम सत्वधर या तब्बल ७० वर्षांच्या वृद्ध महिला आहेत. ज्या वृद्धेचे संपूर्ण आयुष्य घरकामात गेले, त्या माउलीला न्यायालयात चक्क ‘अतिशय धनदांडगी, गुंड, आडदांड आणि राजकीय वरदहस्त असलेली’ ठरवण्यात आले आहे. न्यायालयातून केवळ खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी एका वृद्धेवर आणि सामान्य नागरिकांवर असे बिनबुडाचे आरोप करणे हा अत्यंत लाजीरवाणा, असंवेदनशील आणि घोर अन्यायकारक प्रकार असल्याची तीव्र भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
स्वतःच्या खरेदीखतात (८०५/२०१६) रस्त्याची साईज गायब!
वादी दिलीप रामकिसन गुळभिळे व रमेश भगवान ढोले यांनी २०१६ मध्ये केलेल्या मूळ खरेदीखतात (दस्त क्र. ८०५/२०१६) पूर्वेस आणि दक्षिणेस केवळ ‘रस्ता’ एवढीच मोघम चतुःसीमा नमूद केलेली आहे. त्यामध्ये कुठेही रस्त्याची रुंदी अथवा साईज दिलेली नसताना, आता मात्र दुसऱ्यांच्या खरेदीखतावर (४५४/२०२६) खोटे आक्षेप नोंदवून न्यायालयात दिशाभूल करणारी मांडणी केली जात असल्याचा आक्षेप घेतला जात आहे.
दाव्यातील आरोप पूर्णपणे खोटे व चिखलफेक करणारे
वस्तुस्थिती पाहता दाव्यात केलेली मांडणी पूर्णपणे खोटी असल्याचे उघड होत आहे:
कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही: प्रतिवादी १ ते ५ मधील कोणत्याही व्यक्तीवर पोलीस ठाण्यात कसलाही गुन्हा दाखल नाही.
राजकीय वरदहस्त नाही: हे प्रतिवादी कधीही कुठलीही निवडणूक लढवून सत्तेत आलेले नाहीत अथवा त्यांच्याकडे कसलीही राजकीय ताकद नाही.
सहानुभूतीसाठी चिखलफेक: एका वृद्ध महिलेसह सामान्य कुटुंबातील नागरिकांना ‘गुंड व आडदांड’ ठरवून त्यांची सामाजिक बदनामी करण्याचा हा निव्वळ खालच्या पातळीवरील प्रयत्न आहे.
खरे राजकीय वजन आणि धनदांडगे कोण?
स्थानिक नागरिकांच्या चर्चेनुसार, वादी १) दिलीप गुळभिळे व २) रमेश भगवान ढोले हे १) स्वतः:
केज शहरातील स्थानिक सत्ताधारी जनविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत. व २) आडस ग्रामपंचायत चे माजी सरपंच आहेत
२०२२ पासून केज नगरपंचायतीची सत्ता त्यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रभावाखाली आहे.
त्यांनी केज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खऱ्या हमाल-मापाड्यांवर अन्याय करून हमाल-मापाडी संचालक म्हणून काम पाहिलेले आहे.
स्वतः ते दोघे ४० ते ५० कोटी रुपयांच्या अफाट मालमत्तांचे धनी असून, खरी राजकीय आणि आर्थिक ताकद त्यांच्याच पाठीशी आहे.
सत्तेचा व पदाचा दबाव वापरण्याचा प्रयत्न?
स्वतः कोट्यवधींच्या मालमत्ता, नगरपंचायतीची सत्ता आणि राजकीय रसद पाठीशी असताना, एका ७० वर्षांच्या वृद्धेसह सामान्य कुटुंबातील ५ जणांवर बिनबुडाचे आरोप करून त्यांना न्यायालयात खेचणे व दाव्याच्या माध्यमातून बदनामी करणे हा केवळ राजकीय दबावातून जागा दाबण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणामुळे केज शहरातील राजकीय वर्तुळात व सर्वसामान्य नागरिकांमध्ये वादींच्या भूमिकेबाबत तीव्र संताप आणि चर्चा रंगली आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button