क्राईम

आंदोलक निघाला चोर: मृत विलास घुलेंचा मेव्हणा कृष्णा बाबासाहेब केदार वाहनांची तोडफोड करत मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात; केजमध्ये खळबळ

आंदोलनाचा मुखवटा गळून पडला; कृष्णा केदारवर चोरीचा ठपका!

केज :-केज शहरात देशमुख पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करून आयशर टेम्पो आणि साहित्य लंपास केल्याप्रकरणी सारणी सांगवी येथील कृष्णा बाबासाहेब केदार याच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची पार्श्वभूमी :
फिर्यादी तालेब युनूस शेख यांच्या तक्रारीनुसार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री देशमुख पेट्रोल पंपासमोर उभा केलेला त्यांचा आयशर टेम्पो (क्र. MH 12 HD 0691) चोरीला गेला होता. तसेच शेजारी उभा असलेला आरिफ शरीफ मनियार यांचा टाटा पिकअप टेम्पो (क्र. MH 24 AU 8543) फोडून त्यातील सुटे भाग, बॅटरी आणि मोबाईल असे साहित्य लंपास करण्यात आले. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ₹३,२०,३५०/- आहे. हा आयशर टेम्पो नंतर आडस रोडवरील होळ येथे बंद अवस्थेत मिळून आला.
आरोपीची सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी चर्चेत :
सदर चोरी प्रकरणात नाव निष्पन्न झालेला संशयित आरोपी कृष्णा बाबासाहेब केदार (रा. सारणी सांगवी, ता. केज) हा मृत विलास घुले यांचा मेव्हणा आहे  यांच्या मृत्यूप्रकरणी झालेल्या विविध आंदोलने, आक्रोश मोर्चा आणि आमरण उपोषणांमध्ये सक्रिय सहभाग घेत असल्याचे समोर आले आहे.
स्थानिक पातळीवर घुले कुटुंबीयांच्या आक्रोश मोर्चा उपोषण मधे सहभाग घेणाऱ्या व्यक्तीचे नाव थेट चोरी व तोडफोडीच्या गंभीर गुन्ह्यात समोर आल्यामुळे तालुक्यात यावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. आंदोलनातील सहभाग आणि अचानक उघडकीस आलेली ही गुन्हेगारी कृती यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
पोलीस कारवाई :
या प्रकरणी केज पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२) आणि ३२४(४) अन्वये गुन्हा नोंद क्र. ०५३१/२०२६ दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राहुल कामाजी सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल त्र्यंबक रामराव सोपने या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button