शैक्षणिक
स्व. विश्वंभर कोकीळ यांच्या विचारांचा वटवृक्ष! केजच्या विवेकानंद शाळेची गुणवत्तेकडे यशस्वी घोडदौड
केजचा शैक्षणिक मानबिंदू: ‘स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळा व प्रमोद महाजन कॉलेज’ची उत्तुंग भरारी!

केज शहरात शैक्षणिक क्षेत्रात क्रांती: पारदर्शक कारभारातून साकारला शिक्षणाचा भव्य ‘वटवृक्ष’
– तालुक्यात तब्बल ४० बेरोजगार शिक्षकांना रोजगाराचा आधार देणारी एकमेव संस्था
केज :-केज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्व. विश्वंभर अमृतराव कोकीळ यांनी लावलेले स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच स्व. प्रमोद महाजन महाविद्यालयाचे चिमुकले रोपटे आज गुणवत्तेच्या जोरावर एका भव्य वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. स्व. कोकीळ यांच्या विचारांचा वारसा जपत आणि संचालक मंडळाच्या खंबीर साथीने या संस्थेने केज शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात आपली एक वेगळी आणि अलौकिक ओळख निर्माण केली आहे.
४० बेरोजगार शिक्षकांना आधार देणारी तालुक्यातील एकमेव संस्था
आजच्या काळात जिथे अनेक शिक्षण संस्था बेरोजगारीच्या काळात शिक्षकांचे शोषण करतात, तिथे या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील ४० बेरोजगार शिक्षकांना सन्मानजनक वेतनावर नोकरी देऊन मोठा आधार दिला आहे. संपूर्ण केज तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगार शिक्षकांना रोजगाराचा हात देणारी ही एकमेव शाळा व संस्था ठरली आहे.
खंबीर संचालक मंडळ अन् शिस्तबद्ध व्यवस्थापन
संस्थेच्या या यशस्वी प्रवासात स्व. विश्वाभर कोकीळ, स्व. नाळवंडीकर गुरुजी, श्री. अंकुशराव अण्णा इंगळे, युवराज दादा काळे, ज्ञानेश्वर गदळे सर, नारायणराव अंधारे, डॉ. ज्ञानोबा ज्योतिबा तांदळे, भीमराव बापुराव लोंढे, नईमोद्दीन अ. रहिम इनामदार, विलास काशिनाथराव जोशी, फजिलोद्दीन गौसमोहेद्दीन काझी, उपेंद्र कोकीळ आणि संदीप अंकुशराव इंगळे या संचालक मंडळातील सदस्यांनी दिलेली खंबीर साथ अत्यंत मोलाची ठरली आहे. संचालक मंडळ आणि अध्यक्ष यांचा कोणतीही अनावश्यक हस्तक्षेप नसून, केवळ शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा विकास हाच मुख्य ध्येयध्यास ठेवून ही संस्था वाटचाल करत आहे.
पारदर्शक आर्थिक नियोजन अन् सामाजिक बांधिलकी
सध्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत एकूण ३७ तुकड्या कार्यरत असून, सर्व वर्ग या तुकड्यांचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले जाते. संस्थेच्या पारदर्शक कारभाराची प्रमुख वैशिष्ट्ये:
शिक्षकांना सन्मानजनक वेतन: संस्थेत २३ अनुदानित शिक्षक (विविध टप्प्यांवर) सेवा बजावत असून ३ शिक्षक पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. तर ४० विनाअनुदानित शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा १२ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत सन्मानजनक वेतन वेळेवर दिले जाते. ४ शिपाई कर्मचारीही सेवा देत आहेत.



