क्राईम

उमरी टोल नाक्यावर कर्मचाऱ्याला मारहाण व जीवे मारण्याची धमकी; केज पोलीस ठाण्यात सुग्रीव कराडवर गुन्हा दाखल

सुग्रीव कराडची गुंडगिरी, कायमचीच

केज :-केज तालुक्यातील उमरी टोल प्लाझा येथे फास्टॅग (Fastag) लावण्यावरून झालेल्या वादातून टोल कर्मचाऱ्याला शिवीगाळ, मारहाण करत टोलनाका जाळून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (९ ऑगस्ट) सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुकेश प्रविण देशमुख (वय २०, रा. मस्साजोग, ता. केज) हे उमरी टोल प्लाझा येथे टी.सी. (टोल कलेक्शन) म्हणून कार्यरत आहेत. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास सुग्रीव कराड हे त्यांच्या इनोव्हा क्रीस्टा गाडीतून आले. त्यावेळी टोल कर्मचारी सुकेश देशमुख यांनी त्यांना गाडीवर फास्टॅग लावण्याची विनंती केली.
यावरून संतप्त झालेल्या सुग्रीव कराड यांनी गाडीतून खाली उतरून कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. तसेच कॉलर पकडून चापटबुक्क्यांनी मारहाण करत तेथे असलेली खुर्ची उचलून पोट, मांडी आणि उजव्या हातावर मारून दुखापत केली. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांनाही “मी या सर्व काम करणाऱ्या मुलांसह हा टोलनाका जाळून टाकतो” अशी धमकी दिली.
याप्रकरणी तक्रारदार सुकेश देशमुख यांच्या फिर्यादीवरून सुग्रीव कराड (रा. तांबवा, ता. केज) यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात प्रथम खबर अहवाल (FIR No. 0508/2026) नोंदवण्यात आला आहे.
दाखल कलमे व तपास:
पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केज पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रल्हाद पावरा चव्हाण (बॅच क्र. HC1006) करत आहेत.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button