क्राईमराजकारण

“वारसा विसरलात!”;

"पालकमंत्री पद टिकवण्यासाठी जिल्ह्याला जातीयवादाच्या आगीत ढकलले"

बीड:-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीडचे तात्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजकीय भूमिकेवर, तसेच जिल्ह्यातील बिघडत चाललेल्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर बोट ठेवणारे एक खळबळजनक अनावृत्त पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. “तुम्ही स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा वारसा विसरलात आणि जिल्ह्यात जातीयवादाची दरी निर्माण कोणी निर्माण केली,” असा थेट आणि गंभीर आरोप या पत्राद्वारे करण्यात आला आहे.
बजरंग बप्पा सोनवणे आणि पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख
या पत्रात बीडच्या राजकीय घडामोडींवर अत्यंत गंभीर भाष्य करण्यात आले आहे. “आजचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे हे आधी कोणाच्या नेतृत्वाखाली काम करत होते? याच गुन्हेगारी टोळीने त्यांना बाहेर काढले आणि तुम्ही येथेच लोकसभा पराभवाचा पाया रचला अन पंकजाताई मुंडे पराभूत झाल्या ” असा खळबळजनक आरोप पत्रात करण्यात आला आहे.
“स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि प्रीतमताई मुंडे यांना बीडच्या जनतेने नेहमीच लाखोंच्या मताधिक्याने निवडून दिले. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या झालेल्या पराभवाला तूमच्या पाठीशी असलेली गुन्हेगारी टोळीच जबाबदार आहे,” असा दावा करत परळीत बोगस मतदान करून आणि खंडणीखोरी करून दहशत निर्माण केल्याचे यात म्हटले आहे.
मराठा-ओबीसी वादावरून थेट निशाणा
बीड जिल्ह्यात सध्या पेटलेल्या सामाजिक संघर्षावर पत्रात तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे. “मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे लढत आहेत, तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बीड जिल्ह्यात आणून मराठा विरुद्ध ओबीसी असा जातीय वाद कूनी पेटवला. स्वतःचे मंत्रिपद आणि पालकमंत्री पद टिकवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याला जातीयवादाच्या आगीत ढकलले जात आहे,” असे या पत्रात म्हटले आहे.
विकासाचा खेळखंडोबा आणि बेरोजगारी
गेल्या ३० ते ४० वर्षांपासून जिल्ह्यात मुंडे घराण्याची एकहाती सत्ता असूनही बीडची ओळख अजूनही ‘ऊसतोड कामगारांचा जिल्हा’ म्हणूनच का राहिली? असा सवाल यात उपस्थित केला आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तींमुळे परळीचा औष्णिक वीज प्रकल्प बंद पडला.
जिल्ह्यातील एमआयडीसी (MIDC) ठप्प असून एकही नवीन उद्योग आलेला नाही.
वैद्यनाथ कारखाना बंद पडण्यास आणि ज्ञानराधा बँकेप्रमाणेच वैद्यनाथ बँकेची दुरवस्था होत होती पण ती वाचली यामागे हीच टोळीच कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे.
‘अफाट बुद्धीचा वापर जनतेच्या कल्याणासाठी करा’
पत्राच्या शेवटी धनंजय मुंडे यांना एक कडक सल्ला देण्यात आला आहे. “तुम्ही एका विशिष्ट समाजाचे नसून अठरा पगड जातीचे नेते आहात. तुमच्याकडे अफाट बुद्धी आणि नेतृत्वगुण आहेत, त्याचा वापर गुन्हेगारी प्रवृत्ती पोसण्यासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी न करता, बीड जिल्ह्यातील गरीब जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी करा, अन्यथा जनता या प्रवृत्तीला लगाम लावल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button