क्राईम

समाजसुधारक वाल्मिक कराडची करामत मुख्याधिकारीची फरफट

गुन्हेगाराला तात्काळ सेवा गोरगरीब जनतेला ताटकळत ठेवा

केज:-संतोष देशमुखाची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड यांच्या गुन्हेगारीचे दररोज नवनविन खुलासे होत आहेत त्यात अजुन एक भर पडली आहे केज शहरातील सर्वे नं.११५/६ मधे कमलाकर हंसराज देशमुख यांच्या नावे आसलेला प्लॉट २५×१०० हा प्लॉटची रजिस्ट्री वाल्मिक कराड यांच्या नावावर दि.२९/११/२०२४ रोजी झाली ७/१२ वर वाल्मिक कराड चे नाव येण्यासाठी १५ दिवस लागतात व नगरपंचायतच्या पिटीआर वर नाव लावण्यासाठी दैनिकात जाहीरात देऊन १५ दिवस झाल्यानंतर पिटीआर वर नाव येतात ही झाली सर्व सामान्य जनतेसाठी नियमावली पन केज नगरपंचायत मुख्याधिकारी साहेबाचा वाल्मिक कराड साठी सर्व नियम पायदळी तुडवुन रजिस्ट्री होण्याआगोदर दिनांक एक दिवस आधी जमिन जायदाद नावे नसताना देखील वाईन शॉपच्या नाहरकत ची मागणी करतोय ते चौकशीचा भाग आहे दिनांक २८/११/२०२४ रोजी वाईन शॉप केज शहरात टाकण्यासाठी केज नगरपंचायत ला नाहरकतची मागणी केली ही मागणी मासिक मिटिंग मधे ठराव पास करुन संबधितांना नाहरकत देण्यास पात्र ठरतो पन या वाल्मिक कराड साठी या मुख्याधिकारी साहेबांनी कोणतेही प्रसिद्धी नाही त्यांची मासिक मिंटीग मधे ठराव नाही नावाची पिटीआर नाही रजिष्ट्री झाल्यावर केवळ दोन दिवसानी दिनांक २/१२/२४ रोजी हे नाहरकत त्यांच्या परळी येथे देण्यात आले इतकी तत्परता सामन्य जनतेसाठी कधी दाखवली का
बेकायदेशीर पने दिलेले हे नाहरकत प्रमाणपत्र रद्द करुन दारु बंदी खात्याला कळवले पाहीजे व हे बेकायदेशीर नाहरकत देणारे जो कोणी मुख्याधिकारी आसेल त्यांची चौकशी करुन तात्काळ निलंबित केले पाहीजे या वाल्मिक कराड ने जिल्ह्यात केज वडवनी बीड अन परळी येथे चार ते पाच वाईन शॉप आनलेले आहेत अशी खात्रीपुर्वक माहीती आहे एका वाईन शॉपची बाजार भाव फक्त ५ कोटी रुपये आहे या समाजसुधारक वाल्मिक कराड साहेबांनी युवकांना आकर्षीत करुन त्यांचा वापर अपहरण खुन दरोडे वाळु माफिया मटका असे विविध ठिकाणी हे युवक कामाला लावलेले आहेत त्यामुळे हे युवकामधे समाजसुधारक, आन्ना, बॉस, बाप,असे विविध टोपन नावाने कुप्रसिद्ध आहेत या सर्व गुन्ह्याची व ४/५ वाईन शॉपची चौकशी करायला पाहीजे अन अश्या गैरमार्गेने त्यांना मदत करणारे शासकिय नौकाराची पन चौकशी करुन निलंबीत करावे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button