घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे- मुकुंद राजपंखे
सांस्कृतिक उपक्रमातून विदयार्थ्यांच्या कला- गुणांना प्रोत्साहन मिळते- ह.भ.प. लक्ष्मण इनामदार
आरोग्य संपदा ही काळाची गरज-डॉ. उदय सोनी
जिवन विकास शिक्षण मंडळ, केज संचलित स्वामी विवेकानंद विद्या मंदीर माध्यमिक विभाग या शाळेमध्ये प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शालेय बाल गणेश कल्याण मंडळाच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
व्याख्यानमालेचे शुभारंभाचे पुष्प प्रमुख वक्ते ह.भ.प. श्री. लक्ष्मण इनामदार यांनी गुंफले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून शाळेतील सहशिक्षक श्री. दादासाहेब गायकवाड हे उपस्थित होते. प्रमुख वक्ते ह.भ.प. श्री. इनामदार यांनी आपल्या भाषणामधून गणेश उत्सवाचे महत्त्व विशद केले. आपल्या व्याख्यानातून त्यांनी श्रीगणेशाच्या संपूर्ण शरीराचे वर्णन केले. त्यामागील कारणे सांगितली. गणेश उत्सवाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जाऊ शकतो म्हणून गणेश उत्सव महत्त्वपूर्ण आहे.
अध्यक्षीय समारोपात श्री. गायकवाड सर म्हणाले की, आपण गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव साधायचा आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्कृती जाधव हीने केले, तर आभार आदित्य सूर्यवंशी याने मानले.
व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प अंबेजोगाई येथील प्रमुख वक्ते डॉ. उदय सोनी यांनी गुंफले याप्रसंगी अध्यक्ष म्हणून श्री. दत्तात्रय सत्वधर हे उपस्थित होते. प्रमुख वक्ते डॉ. उदय सोनी यांनी आपल्या व्याख्यानातून आरोग्य संपदा या विषयावर मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानातून दातांची काळजी कशी घ्यावी हे काही प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. दातांची काळजी घेतली म्हणजे आपल्याला इतर आजार होत नाहीत म्हणून आपण सर्वप्रथम दातांची काळजी घेतली पाहिजे व दात स्वच्छ ठेवले पाहिजेत. डॉ. उदय सोनी हे शाळेचे माजी विद्यार्थी असून ते सध्या अंबेजोगाई येथे डेनटिस्ट म्हणून कार्य करत आहेत ते गोल्ड मेडलिस्टही आहेत.
अध्यक्षीय समारोप करताना श्री. सत्वधर सर म्हणाले की, विदयार्थ्यांनी नेहमी नियमित व्यायाम करायला हवा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षिता तांदळे हिने केले तर आभार जोयाफातेमा सय्यद हिने मानले.
व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प कवी संमेलनाच्या माध्यमातून पार पडले. हे पुष्प गुंफण्यासाठी अध्यक्ष म्हणून श्री. जनार्धन सोनवणे प्रमुख कविवर्य म्हणून श्री. मुकुंद राजपंखे श्री. हनुमंत घाडगे, श्री. हनुमंत सौदागर, प्रमुख अतिथी म्हणून जीवन विकास शिक्षण मंडळ केज या संस्थेचे सचिव श्री. गिन्यानदेव गदळे तसेच माजी मु.अ. श्री. बी. व्ही. गोपाळघरे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष तथा कविवर्य श्री. जनार्धन सोनवणे यांनी स्वरचित ‘अशी माझी माय या सुंदर कवितेने केले. या कवितेतून आईवडीलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असा संदेश दिला. त्यानंतर, श्री. राजपंखे सरांनी ‘लेक’ या विषयावर छोटी कविता सादर केली ते म्हणाले, “लेक मातेने खूप शिकावे आता, रोज खावी साय, साखर, तूप आता, आज कर्मावर तिला सन्मान आहे, कोण पुसतो गौर काया वर्ण आता” त्यानंतर सरांनी स्वरचित ‘माझा बाप माझा देव’ ही कविता सादर केली.संरांनी शेवटी “घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे, लोक येतील शब्दावरी धाऊनी, वागणे आपुले चांगले पाहिजे” ही कविता सादर केली.त्यानंतर, श्री. घाडगे सरांनी गणपती बाप्पावर व आपल्या वडिलांवर स्वरचित कविता सादर केली. पुढे श्री. सौदागर सरांनी ‘सावित्रीच्या लेकी’ हे सुंदर तिरकस विदयार्थ्यांसमोर सादर केले. अध्यक्षीय समारोप करताना श्री. जनार्धन सोनवणे यांनी सुंदर कविता सादर केली, “कुठे चाललो मी विचारता कशाला जिंकण्याची उर्मी आहे कोणत्याही दिशेला.”कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जोयाफातेमा सय्यद हिने केले तर आभार हर्षा सत्वधर हिने मानले.
व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प प्रमुख वक्ते श्री. गाजरे सर यांनी गुंफले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून श्री. संदीप शेंडगे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जीवन विकास शिक्षण मंडळ केज या संस्थेचे सचिव श्री. गिन्यानदेव गदळे हे उपस्थित होते.याप्रसंगी प्रमुख वक्ते श्री. गाजरे सर यांनी आपल्या व्याख्यानातून साने गुरुजींचे विस्तृत चरित्र थोडक्यात विदयार्थ्यांसमोर मांडले. साने गुरुजी यांनी आपल्या जीवनात जी वेगवेगळी पात्र निभावली त्याबद्दल माहिती दिली. आई कशी असावी ? याबद्दल सांगताना सरांनी ‘श्यामची आई’ या पुस्तकातील विविध गोष्टी सांगुन विद्यार्थ्यांना प्रेरित केले. सरांनी “मातृहृदयी सानेगुरुजी” या विषयावर अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्या सुवाणीतून केले.अध्यक्षीय समारोप करताना श्री. शेंडगे सर म्हणाले की, सण-उत्सव हे आपण सांभाळून साजरे केले पाहिजेत. आपली व इतरांची काळजी घेऊन आपण सण-उत्सव हे काळजीपूर्वक साजरे केले पाहिजेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हर्षा सत्वधर हीने केले तर आभार जोयाफातेमा सय्यद हीने मानले.सदरील व्याख्यानमालेचे वृत्तांत लेखन इयत्ता दहावी ब मधील विद्यार्थ्यांनी सय्यद जोयाफातेमा जुबेर हिने केले. ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शालेय बालगणेश कल्याण, मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच मंडळाच्या अध्यक्षा तथा कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका श्रीमती. शिवनंदा मुळे मॅडम, उपाध्यक्ष रामहरी जाधव, सचिव आदित्य राऊत, सहसचिव अपूर्वा सोनवणे, कोषाध्यक्ष आदित्य भुसारे, विदयार्थीनी प्रतिनिधी विशाखा केंद्रे तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. प्रबोधकांत समुद्रे व सांस्कृतिक विभाग साहाय्यक श्री. कल्याण आदमाने आदींनी विशेष परिश्रम घेतले.