Uncategorized

“मुंडेंनी ठरवलं असतं तर नामोनिशान उरलं नसतं! विनाकारण वाद उकरण्यापेक्षा भावाच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळवून द्या!”

"मस्साजोगचा पराभव पचनी पडेना? धनंजय मुंडेंवर तोंडसुख घेणाऱ्या देशमुखांना जाहीर सल्ला; 'आता सबुरीने घ्या!'"

बीड:-कौटुंबिक दु:खातून सावरून धनंजय देशमुख यांनी आता राजकीय वास्तवाचे भान ठेवावे आणि रोजच्या चर्चेत राहण्यापेक्षा आपल्या भावाच्या मारेकऱ्यांना शिक्षा कशी होईल याकडे लक्ष द्यावे, असा सूर आता उमटू लागला आहे. मस्साजोग येथील निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव झाला. मात्र, हा पराभव धनंजय देशमुख यांच्या पचनी पडलेला दिसत नाही. त्यांनी या पराभवाचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
दुसरीकडे, राजकारणात अनेक चढ-उतार पाहिलेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही या संपूर्ण प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या कथित दादागिरीमुळे आणि गुन्हेगारी प्रकरणांमुळे शेवटी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या सर्व वादळात धनंजय मुंडे यांनी स्वतःला बीड जिल्ह्यापासून काहीसे दूर ठेवले असून, कायदेशीर प्रक्रियेत ही केस कशी ढिली होईल याकडेच त्यांचे जास्त लक्ष असल्याचे दिसते.

बुडबुड्याचे आरोप करून सहानुभूती मिळणार नाही

धनंजय देशमुख यांच्याकडून होत असलेल्या आरोपांवरून आता राजकीय वर्तुळातून उघड भाष्य केले जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावर तथ्यहीन आरोप करून केवळ सहानुभूती मिळवण्याचा भाबडा प्रयत्न देशमुखांनी थांबवावा. मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप पुढे गेलेले नेते आहेत. जर त्यांना खरोखरच देशमुखांचे नामोनिशान मिटवायचे असते, तर त्यांनी ते कधीच केले असते, अशीही चर्चा आहे.

“तुमची तर फक्त सरपंचकी गेली आहे, पण धनंजय मुंडे यांना महाराष्ट्रातील प्रमुख कॅबिनेट मंत्रीपदावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे त्यांचा पोटशूळ आणि संताप किती मोठा असेल, याचा विचार देशमुखांनी करावा.”

सबुरीने घेण्याचा सल्ला

धनंजय देशमुख यांनी आता जास्त भानगडीत न पडता सबुरीने घेण्याची वेळ आली आहे. जनभावनेचा आदर करत, विनाकारण चिखलफेक करण्याऐवढी त्यांनी संपूर्ण लक्ष न्यायालयीन प्रक्रियेवर केंद्रित करावे, जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळू शकेल, असा सल्ला जाणकारांकडून दिला जात आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button