
केज:- केज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुलांची ) शुक्रवार पेठ केज येथे तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुलींची ) ही शाळा हनुमान गल्ली केज येथे कार्यरत होती व सगळ्यांत मोठी शाळा ही जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज ही होती या शाळेत जवळपास १२००विद्यार्थी शिक्षण घेत होते या शाळेत एका तुकडीत अ ब क ड ई इतके वर्ग होते एका वर्गात जवळपास तीस पस्तीस विद्यार्थी शिक्षण घेत होते या तीन शाळा केज शहरात शिक्षणासाठी फार प्रसिद्ध होत्या या शाळेने शेकडो विद्यार्थी घडवले पन हि शाळांचे आस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे कारण काय विद्यार्थी पटसंख्या कमी आहे म्हणून आज २६जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काही या शाळेत शिकलेले माजी विद्यार्थी राज्यभरात विविध ठिकाणी मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत व काही राजकीय,समाजसेवक, पत्रकार,शेतकरी,व्यापारी, मजुरी अश्या विविध ठिकाणी कार्यरत आहेत तर काही सेवानिवृत् झाले आहेत तर काही आपल्याला सोडुन गेले आहेत त्यांना सगळ्यांच्या वतीने भावपुर्ण आदरांजली पन आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एकत्रित आलो आहोत ते या शाळेने आम्हाला घडवले त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अन् आम्ही ही शाळा चालु होण्यासाठी आम्ही या शाळेचे विद्यार्थी माजी मंत्री मा. आशोकरावजी पाटील राज्यसभेचे खासदार रजनीताई पाटील विद्यमान खासदार बजरंग बप्पा सोनवने व या मतदार संघाच्या विद्यमान आमदार सौ. नमिताताई मुंदडा व केजचे कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती आकूंशराव इंगळे उपसभापती वासुदेव नेहरकर व केजचे नगरपंचायत चे सर्वेसर्वा हारुनभाई इनामदार व नगराध्यक्ष सौ.सिताताई बनसोड या सर्व राजकीय नेत्यांशी चर्चा करून या शाळेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न केला जाईल त्यासाठी आम्ही माजी विद्यार्थी वाटेल ती मदत करण्यासाठी तयार आहोत
या शाळेचा मी पन विद्यार्थी आहे बॅच १९८७ ते १९८९ विनोद शिंदे हनुमान गल्ली केज



