क्रीडाशैक्षणिक

केज जिल्हा परिषद माध्यमिक शाळा वाचवण्यासाठी ६०० माजी विद्यार्थी सरसावले

१२०० विद्यार्थी आसलेल्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा अखेरची घटका मोजत आसताना परत चालु करण्यासाठी माजी विद्यार्थी एकवटले

केज:- केज शहरातील शेकडो विद्यार्थी घडवलेली शाळा म्हणजे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज या शाळेने केज,टाकळी,कदमवाडी,उमरी,कानडी माळी ,साबला ,धर्माळा, पिसेगाव, तांबवा,बोबडेवाडी,साळेगाव, या परिसरातील शेकडो विद्यार्थी या शाळेत शिकले आज ते विविध मोठ्या पदावर कार्यरत आहेत ते ३०/४०वर्षानंतर एकत्र येऊन ही शाळा विद्यार्थी पटामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे तरी या माजी विद्यार्थी मुळे ही शाळा चालु होण्याच्या मार्गावर आहे तरी उद्या २६/१/२०२६रोजीच्या झेंडावंदन करण्यासाठी जवळपास ६०० माजी विद्यार्थी येणार आहेत झेंडावंदन सकाळी ७.५० होणार त्यानंतर केज शहरात केज नगरपंचायत चे ध्वजारोहण कार्यक्रम उपस्थिती नंतर शुक्रवार पेठेतील गांधी चौकात ध्वजारोहण नंतर गुंड गल्ली मंगळवारपेठ मेन रोड वरुन जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे नंतर शाळेची इमारत दुरुस्ती व पुनर्रचना यावर सखोल चर्चा व विद्यार्थी पट वाढवण्यासाठी चर्चा व प्रशासकीय अधिकारी बरोबर चर्चा करण्यात येणार आहे या मधे या शाळेत शिकलेले आज ते मंत्रालयात नोकरीला आहेत त्यांच्या सोबत शाळेला गतवैभव प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत तरी केज व परिसरातील माजी विद्यार्थी यांनी उपस्थित रहावे ही विनंती स्थानिक पातळीवरील माजी विद्यार्थ्यानी केले आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button