राजकारण

दोन आमदारांचे राजीनामे, आणखी चार आमदार राजीनामे देण्याच्या तयारीत

खासदार पदी निवड झाल्यामूळे देणार राजीनामा

 विधानसभेतील दोन आमदारांनी राजीनामे दिले असल्याची माहिती समोर आली आहे. ते आमदार सध्या विद्यमान खासदार आहेत. तर आता आणखी चार आमदार हे राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. सोलापुरच्या माजी आमदार प्रणिती शिंदे यांना जनतेनं खासदार म्हणून निवडून दिलं आणि त्या सोलापूरच्या पहिल्या खासदार आहेत. तर दुसरीकडे बळवंत वानखेडे देखील आमदार होते त्यांनी देखील आमदाराकीचा राजीनामा दिला आहे.

महाविकास आघाडीने राज्यात एकूण 30 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे महायुतीने केवळ 17 जागांवर विजय मिळवला असून अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे देखील सांगलीतून विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. आता 7 सात विद्यमान आमदार आहेत त्यामुळे आता सर्वांनाच राजीनामा द्यावा लागणार आहेत.

राज्यातील निवडणुकांची घोषणा ही पुढील चार ते पाच महिन्यात होणार आहे. त्यामुळे आता सर्वांनाच विधानसभा निवडणुकांचे वेध लागलं आहे. लोकसभेनंतर आता राजकीय नेत्यांचं लक्ष हे विधानसभा निवडणुकीकडे लागलं आहे. नवनिर्वाचित खासदारांनी आमदारकीचा राजीनामा  द्यायला सुरूवात केली. त्यांना आगामी 20 जूनपर्यंत राजीनामा द्यायला सुरूवात केली आहे.

‘या’ आमदारांनी दिला राजीनामा
आता पर्यंत प्रणिती शिंदे आणि बळवंत वानखेडेंनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मात्र आता अद्याप आमदार रविंद्र वायकर, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर व मंत्री संदीपान भुमरे यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा आहे. यामुळे आता उर्वरित आमदारही लवकरच राजीनामा देतील.

‘हे’ आमदार राजीनामा देण्याच्या मार्गावर
विदर्भातील वर्धा विधानसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर आमदार होत्या. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट सुधीर मुनगुंटीवार यांचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पराभव केला. तर मराठवाड्यातील संदीपान भुमरे यांनी औरंगाबाद मतदारसंघातून पराभव केला. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवेंचा जालना लोकसभा मतदारसंघात पराभव केला. तर रवींद्र वायकर यांनी अमोल किर्तीकरांचा केवळ 48 मतांनी विजय मिळवला आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button