Uncategorized

लोकनेते अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त सोनीजवळा सरपंच सौ. जानवी ससाणे यांच्याकडून अभिवादन!

'कामाचा माणूस' अजितदादा पवार यांना जयंतीदिनी शतशः नमन: सौ. जानवी गोविंद ससाणे

केज/सोनीजवळा:-महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात आपल्या कर्तृत्वाचा अजरामर ठसा उमटवणारे, जनमानसातील लाडके नेते आणि ‘कामाचा माणूस’ म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सोनीजवळा येथील सरपंच सौ. जानवी गोविंद ससाणे यांनी त्यांना शतशः नमन करत भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
दादांचा वक्तशीरपणा, कडक शिस्त आणि दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळण्याची वृत्ती ही राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांसाठीच खूप मोठी शिकवण आहे, असे मत सरपंच सौ. जानवी ससाणे यांनी व्यक्त केले.
तळागाळातील घटकांसाठी अखंड कार्य
अजितदादांच्या नेतृत्वाचा गौरव करताना सौ. जानवी ससाणे म्हणाल्या की,

“तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी दादांनी आयुष्यभर अखंडपणे काम केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राला गतिमान आणि दूरदृष्टी असणारे खंबीर नेतृत्व दिले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात दादांचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिला आहे.”

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी
बीड जिल्ह्याशी असलेल्या दादांच्या स्नेहाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, जिल्हयातील सिंचन, शिक्षण आणि शेतीच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी अजितदादांनी नेहमीच सर्व भागांना भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.
अशा या कार्यसम्राट आणि लोकप्रिय नेत्याच्या विचारांचा आणि विकासाचा समृद्ध वारसा आपण सर्वांनी अधिक निष्ठेने पुढे घेऊन जायचा आहे, असा संकल्पही यावेळी सरपंच सौ. जानवी गोविंद ससाणे यांनी व्यक्त केला.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button