Uncategorized
केजमध्ये वतनदारांच्या ‘जावयांचा’ धुमाकूळ! सासऱ्याच्या दावणीला बांधलेले ‘परावलंबी’ जावई रडारवर!
सासरच्या संपत्तीवर 'जेवत्या' जावयांचा डोळा; केजकराचा थेट गाढवावरून मिरवण्याचा इशारा!

केज शहरातील ‘तुकडेमोड’ जावयांवर ग्रामस्थ आक्रमक; पण आंगठीच्या लालसेने गाढवाच्या जिवाला धोका!
केज :- केज शहरात सध्या वतनदारांच्या जावयांची जोरदार चर्चा रंगली असून, सासरच्या जीवावर उड्या मारणाऱ्या अन् गावाला ‘इसार’ देणाऱ्या परावलंबी जावयांविरोधात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. स्वाभिमान सोडून सासरच्या संपत्तीवर डोळा ठेवून बसलेल्या या जावयांमुळे केज शहरात एकच धुमाकूळ उडाला असून, आता अशा ‘तुकडेमोड’ जावयांची थेट ‘गाढवावरून मिरवणूक’ काढण्याचा इशारा ग्रामस्थांमधून दिला जात आहे.
केजमधील जावयांचे तीन वर्ग: कोण ‘स्वाभिमानी’ अन् कोण ‘लांडगे’?
केज शहरातील वतनदारांच्या जावयांची सध्या तीन प्रमुख वर्गांत विभागणी केली जात आहे:
१. स्वाभिमानी आणि स्वावलंबी जावई (सन्माननीय वर्ग)
पहिल्या वर्गात ते जावई येतात जे स्वतःच्या कष्टावर आणि हिमतीवर आपली उपजीविका चालवतात. ते सासू-सासऱ्यांच्या संपत्तीवर किंवा जीवावर अजिबात डोळा ठेवत नाहीत. स्वतःच्या कष्टाचे खाऊन स्वाभिमानाने जगणाऱ्या या जावयांचा वतनदार आणि संपूर्ण केज शहर आदराने गौरव करते. नात्याची शोभा वाढवणारे हेच खरे जावई असल्याचा सार्थ अभिमान केजकरांना आहे.
२. ‘तुकडेमोड’ आणि परोपजीवी जावई (चिंचपूरच्या मारुतीचे ‘जेवते’)
दुसऱ्या वर्गात मोडणारे जावई म्हणजे केज शहराला लागलेली एक प्रकारची कीडच मानली जात आहे! स्वतःचे आई-बाप, भाऊ आणि जन्मगाव सोडून संपत्तीच्या लालसेने सासरच्या घरी तळ ठोकून बसलेले हे जावई निव्वळ ‘परोपजीवी’ आहेत.
शनिवारी चिंचपूरच्या मारुतीला जाऊन कढी-शिरा दाबायचा अन् उरलेला घरी घेऊन यायचा!
द्वादशी, बालाजी मंदिर, गणपतीची चतुर्थी… जेथे फुकटचे जेवण तिथे हे ‘जेवते’ हजर!
स्वतःचे आई-बाप अन् भूमी सोडून सासरच्या तुकड्यांवर टपून बसलेले हे जावई म्हणजे सासरच्या संपत्तीवर फणा काढून बसलेल्या नागासारखे डुलत फिरत आहेत.
३. बुडत्या घराच्या संपत्तीवर ‘नाग’ बनून डुलणारे दिशाहीन जावई
तिसऱ्या प्रकारात मोडणाऱ्या जावयांचे आणि त्यांच्या बापांचे गणितच वेगळे आहे! मुलगा केजच्या वतनदाराचा जावई झाला की स्वतःला विकणारे हे बाप आणि सासरच्या दावणीला बांधले गेलेले हे दिशाहीन जावई!
स्वतःचे घर बुडत असताना सासरच्या संपत्तीवर डोळा ठेवायचा अन् काही अडचण आली किंवा कोणाशी हुज्जत झाली की, “मी केजच्या वतनदाराचा जावई आहे!” अशी आरोळी ठोकून स्वतःचा बालकटपणा दाखवायचा, हा यांचा दररोजचा धंदा झाला आहे. सासऱ्याचे खायचे आणि संपूर्ण गावाला अक्कल शिकवायची, अशा या जावयांच्या वागण्याने केजकर पार वैतागले आहेत.
तणकट जावयांना थेट इशारा; पण गाढवाच्या जिवाला मोठा धोका!
“स्वतःच्या आई-वडिलांची सेवा सोडून, स्वाभिमान गहाण ठेवून सासरच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवणाऱ्या या लांडग्यांनी आणि परावलंबी टोळक्याने त्वरित सुधारून स्वतःला आवरावे! अन्यथा, ‘विडा’ गावचा आदर्श घेऊन धुरवडीच्या दिवशी सोन्याची आंगठी देऊन अशा ‘जेवत्या जावयांची’ केज शहरातून ‘गाढवावरून मिरवणूक’ काढली जाईल!” असा कडक इशारा आता केजमधील जागरूक नागरिकांनी दिला आहे.
धक्कादायक शक्यता:



