क्राईम

“संतोष देशमुख हत्येचा आकस; ना.धनंजय मुंडेंचे कारस्थान केज कोर्टात धुळीस; खासदारपुत्र सौरभ सोनवणे पूर्णपणे निर्दोष?

बीड/केज:-जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या विलास घुले हत्या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात नाव समोर आलेले बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचे सुपुत्र सौरभ सोनवणे यांचा या गुन्ह्याशी कोणताही संबंध नसल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी सर्व तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबाअंती केज न्यायालयात (कोर्टात) अंतिम दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले असून, या चार्जशीटमधून सौरभ सोनवणे यांचे नाव पूर्णपणे वगळण्यात आले आहे? पोलिसांच्या या निष्पक्ष तपासामुळे विरोधकांचे राजकीय कारस्थान पूर्णपणे उघडे पडले आहे.
संतोष देशमुख प्रकरणात कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याचा आकस!
या बातमीला आता तीव्र राजकीय रंग आला असून, खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या समर्थकांनी थेट आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
राजीनाम्याचा आकस आणि केवळीवाणी खेळी: काही काळापूर्वी गाजलेल्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांना आपल्या कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याच गोष्टीचा मनात तीव्र आकस आणि राजकीय द्वेष ठेवून, खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला गोवण्यासाठी हे संपूर्ण कारस्थान रचले गेले.
खासदारपुत्राला अडकवण्याचा प्रयत्न फेल: संतोष देशमुख प्रकरणात झालेल्या राजकीय पराभवाचा बदला घेण्यासाठीच विलास घुले हत्या प्रकरणात खासदारपुत्र सौरभ सोनवणे यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले. त्यांना या हत्याप्रकरणात अडकवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून झाला, मात्र पोलिसांच्या निष्पक्ष आणि तांत्रिक तपासामुळे हे संपूर्ण राजकीय षड्यंत्र पूर्णपणे फेल (उध्वस्त) झाले आहे.
केज पोलीस ठाण्यातील तो धुमाकूळ आणि एसपी नवनीत कावतांची तत्परता
विलास घुले यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील सर्व धनंजय मुंडे समर्थकांनी केज पोलीस स्टेशनमध्ये प्रचंड धुमाकूळ घातला होता. खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या मुलाला या गुन्ह्यात कोणत्याही परिस्थितीत आरोपी करा, यासाठी मुंडे समर्थकांनी पोलिसांवर अभूतपूर्व दबाव आणला होता. मयताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेत प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला गेला.
मात्र, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अत्यंत हुशारीने आणि तत्परतेने परिस्थिती हाताळली. मुंडे समर्थकांचा यामागील राजकीय कावा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ ओळखला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि मयताचा अंत्यविधी वेळेत पार पाडण्यासाठी, पोलिसांनी केवळ चौकशीसाठी म्हणून पुरवणी यादीत सौरभ सोनवणे यांचे नाव घेण्यात आल्याचे आंदोलकांना सांगितले. त्यानंतरच विलास घुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चौकशीत तथ्य आढळले नाही; दादागिरी मोडीत!
पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून सौरभ सोनवणे यांची सखोल चौकशी केली. मात्र, या तपासात त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा, संशयास्पद कॉल डिटेल्स किंवा घटनास्थळाचे लोकेशन मिळून आले नाही. मुंडे समर्थकांचे सर्व आरोप पूर्णपणे तथ्यहीन असल्याचे स्पष्ट झाले.
केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि लाभ मिळवण्यासाठी मुठभर लोकांनी संपूर्ण प्रशासनाला वेठीस धरले होते. मात्र, या प्रकरणात केज कोर्टात लवकरच चार्जसिट दाखल होणार आहे  झालेल्या या  आता अशा कोणत्याही दादागिरीला जनता किंवा पोलीस प्रशासन अजिबात भीक घालणार नाही.

राजकीय वर्तुळातील प्रतिक्रिया:
“सत्य परेशान होऊ शकते, पण पराजित नाही. कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याचा आकस मनात ठेवून एका तरुण नेतृत्वाला आणि खासदार कुटुंबाला बदनाम करण्याचे विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळाले  आहे यांचे राजकीय मनसुबे  धुळीस मिळाले आहेत. हा पोलिसांच्या निष्पक्षतेचा आणि सत्याचा मोठा विजय आहे.”

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button