राजकारण

देवेंद्र फडणविसाच्या कामगिरीचा कळस

नियत सूड घेतच आसते

अकेला देवेंद्र !

२०१४ च्या पुर्वी अनेक पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस या इसमाला एकनाथ खडसे यांच्या पुढे मागे करताना पाहिलं होतं. चांगला बोलता येणार चुणचुणीत तरूण आमदार, कायद्याचा अभ्यास असलेला, मर्मभेदी शब्दफेक करत विरोधकांना घायाळ करणारा आमदार. नुकत्याच पेव फुटलेल्या इलेक्ट्रीक माध्यमांनी उचलून धरलेला विरोधी पक्ष नेता, कुशाग्र बुध्दीमत्ता असलेला आमदार देवेंद्र फडणवीस !

२०१४ साली मोदी लाटेमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकित सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष म्हणून भाजप पुढे आला. भाजपच्या या विजयात समाज माध्यमांसोबत इलेक्ट्रीक माध्यमांचाही वाटा होताच. त्यानंतर दिल्लीश्वरांच्या अशिर्वादाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद बहाल करण्यात आले. ज्येष्ठ असलेल्या एकनाथ खडसे यांना डावलून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदी बसवण्यात आलं ते केवळ त्यांची जात ब्राह्मण आहे म्हणूनच ! त्यानंतर खडसेंच फडणवीसांनी काय केलं हे अवघ्या महाराष्ट्राने बघितलं. सुरवातीचे एक दोन वर्ष देवेंद्र फडणवीस एकदम प्रतिमेला साजेसं काम करत होते. त्यांची लोकप्रियताही वाढत होती. पुढे त्यांना ग ची बाधा झाली. भाट मंडळींच्या कोंडाळ्यात फडणवीसांचा तोल जावू लागला. जाती जाती तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्यांना फडणवीसांनी जवळ केले. किंबहुना फडणवीसाच्या पाठिंब्यामुळे बेताल वक्तव्य करणारांना राज मान्यता मिळत गेले.

नियती सुड घेतच !

२०१४ साली मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद देण्यास नकार दिला. कारण उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसल्याचा दावा फडणवीसांनीच केला होता. पुढे त्याच शिॅदेंना मुख्यमंत्री पदी बसताना देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर बसावं लागलं. हा काळानेच त्यांचा सुड उगवला होता. त्यानंतर गर्वाने दोन दोन पक्ष तोडून मी पुन्हा आलो सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना लोकसभेत लोकांनी नाकारल्यानंतर राजीनामा देत असल्याचं सांगत “मला मोकळ करा” असा टाहो फोडला ! म्हणजे अकेला देवेंद्र सब पे भारी म्हणणारी राणे, लाड, राणा, दरेकर, कदम मंडळींची तोंडं बघण्यासारखी झाली होती. तर समाज माध्यमातील लावारिस अवलादी देवेंद्र फडणवीस कसे चाणक्य आहेत याच्या कथा रचण्याच मश्गूल होते.

दहा वर्ष थेट दिल्लीतून परावर्तित ताकदेचा नीट वापर देवेंद्र फडणवीस यांना करता आला नाही. त्या ताकदीचा वापर स्वपक्षीय मंडळींनाच संपवण्यात करण्यात आला. लोकसभा निवडणुकित जनतेची नस ओळखण्यात देवेंद्र फडणवीस कमी पडले. उदा. माढा, सोलापूर जनतेची नस समजून न आपला हेका चालवत उमेदवार दिले. त्यामुळे दोन्ही ठिकाणी पराभव पत्करावा लागला.

सतत स्वतच्या प्रतिमेच्या प्रेमात राहणं देवेंद्र फडणवीसांना भवलं. २०१६ नंतर कुशाग्र बुध्दीमत्ता असताना, नीतीमत्ता चांगली असताना राज्यात कौतुक झालं. त्यानंतर मात्र राजकारणात रिलीव्हंट राहण्यासाठी काहीही करण योग्य असं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी फोडाफोडीच्या राजकारणाचे समर्थन करताना पवारांच्या फोडाफोडीच उदाहरण दिले. पण शरद पवारांनी यंत्रणांचा वापर करून फोडाफोडी केली नव्हती. कोणताही पक्ष फोडून त्या पक्षांवरच दावे सांगितले नव्हते. उलट राजकीय महत्वकांक्षा असलेल्या कुटुंबातले सदस्य स्वेच्छेने येतील असं वातावरण निर्माण केलं होतं. धनंजय मुंडे राष्ट्रवादीत येण्यास मागे लागला असताना गोपीनाथ मुंडेना चार वेळा त्यांना समजवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर पवारांचा नाईलाज झाल्यावर मग धनंजय मुंडे यांना पक्षात घेतलं. पवारांच्या त्या राजकारणाला ग्रेस होता. शरद पवारांच्या राजकाराणाची काॅपी करताना देवेंद्र फडणवीस नेमके हेच विसरले.

देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांच्या नंतर राज्यात सर्वाधिक सर्वसमावेशक राजकारण करण्याची क्षमता आणि संधी होती. मात्र देवेंद्र फडणवीसांना केवळ अहंगडाच राजकारण अहम नडलाय. पडळकर, लाड , कंबोज, कदम, राणा, राणेंसारखे किळसवाणे व्यक्तव्य करणाऱ्या मंडळींमुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत येत गेले.

शरद पवारांचा काळ संपला असल्याचा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राज्याची सुत्रे हातातून जात असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आपल्या वागण्यात बदल करण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण वैयक्तिक शत्रुत्व घेतल्यासारख खुनशी करण्याचा ट्रेंड सेट केला. आपल्यावर टीका करणाऱ्या संपादक, पत्रकारांच्या नोकऱ्या घालवण्यापर्यंत खालची पातळी गाठली गेली. त्याचा सगळ्यात जास्त फटका देवेंद्र फडणवीसांना बसला. अशा पातळयंत्री वागण्यामुळे देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा “अनाजी पंत“ म्हणून झाली.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाली की मी ब्राह्मण असल्यानेच विरोध होत असल्याची दावा फडणवीस यांच्याकडून केला गेला. मुळात ब्राह्मण असल्यानेच मुख्यमंत्री पद मिळाले हे विसरलेले देवेंद्र फडणवीसांना टीका होताना मात्र ब्रह्मणत्व आठवलं. राज्यात नितीन गडकरी हे ब्राह्मण असूनही लोकांनी डोक्यावर घेतलेलं नेतृत्व आहे. तेही भाजपचेच आहेत अन् हेही भाजपचेच !

आपल्या राजकिय महत्वकांक्षीसाठी मित्र जोडताना पक्षांतर्गच मित्र वाढवण्याऐवजी दुसऱ्या पक्षातील नेते भाजपात आणून देवेंद्र फडणवीसांनी आपला गट मजबूत केला. देवेंद्र फडणवीसांवर टीका झाल्यानंतर धावून येणाऱ्यांमध्ये नेत्यांमध्ये गिरीश महाजन वगळता एकही पुर्वाश्रमीचा भाजपीय नाही. लाड, राणे, राणा, पडळकर, वाघ, दरेकर, कदम ही मंडळी मुळची भाजपची नाही. त्यामुळे तावडे, मुंडे, खडसे, मुनंगटीवार आदी मूळ भाजपच्या मंडळींना देवेंद्र फडणवीसांनी कळत न कळत दुखावले आहे. त्या मंडळींना फक्त संधी मिळाली तर ते जुना हिशोब चुकता करतील त्यावेळी सत्तास्थानापासून दूर फेकलेले “देवेंद्र अकेला” राहिलं हे सांगण्यासाठी ज्योतीषाची गरज नाही !

⁃ ब्रह्मा चट्टे

 

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button