क्राईम

अजित पवार ‘या’ घोटाळ्यामुळे पुन्हा अडचणीत सापडणार?

मूंबई:- राज्यातला शिखर बँक घोटाळा चांगलाच चर्चेत आहे. अशातच आता पुन्हा एकदा या घोटाळ्याने डोकं वर काढलं आहे. कारण शिखर बँक घोटाळा प्रकरणातील अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आव्हान देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या क्लीन चिटला अण्णा हजारे विरोध करणार आहेत.

शिखर बँक घोटाळा प्रकरणातील अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लोजर रिपोर्टला विरोध करणार आहेत. यासंदर्भात अण्णा हजारे हे कोर्टात देखील धाव घेणार आहेत. अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप हा अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी घेतला आहे.

याप्रकरणी न्यायालयाने देखील हा आक्षेप मान्य केला असल्याने यावर निषेध याचिका दाखल करण्यास वकिलांना वेळ दिला आहे. अशातच आता या संदर्भात पुढील सुनावणी ही 29 जूनला होणार आहे. तसेच यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवार आणि इतरांना क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांच्या या निर्णयावर देखील न्यायालय सखोल अभ्यास करणार आहे.

अजित पवार, सुनेत्रा पवारांच्या अडचणी वाढणार? :
राज्यात बहुचर्चित असलेला हा २५ हजार कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि इतर आरोपींच्या काही महिन्यांपूर्वी अडचणी वाढल्या होत्या. मात्र त्यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सर्वाना धक्का देत अजित पवारांना मोठा दिलासा दिला होता. तसेच, या घोटाळ्या प्रकरणी कोणतेच पुरावे नसल्याचं मुंबई पोलिसांनी देखील म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणातील सर्व दोषींना दिलासा देण्यात आला होता.

तसेच अजित पवार व सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दिलासा देण्यात आलेला होता. तसेच याविषयी मुंबई पोलिसांनी जानेवारी महिन्यात क्लोजर रिपोर्ट देखील सादर केला होता. बँकेच्या कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीत अनियमितता असल्याचे आरोप अजित पवार आणि इतर आरोपींवर करण्यात आले होते. मात्र आता ती फाईल क्लोज झाली असून अजित पवार यांना दिलासा देण्यात आला आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button