शैक्षणिक

जि.प. शाळांमधील ४४ गुणवंतांची भरारी: ‘समग्र शिक्षा’ अंतर्गत हैदराबाद विज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी निवड; ३१ ऑगस्टला प्रस्थान, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी

राष्ट्रीय अविष्कार अभियान: बीडच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील ४४ विद्यार्थ्यांना हैदराबादची शैक्षणिक सफर; असा असेल दौऱ्याचा कार्यक्रम

बीड:जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) अंतर्गत ‘समग्र शिक्षा’च्या राष्ट्रीय अविष्कार अभियान २०२५-२६ या उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील निवडक ४४ विद्यार्थ्यांसाठी राज्याबाहेर हैदराबाद (तेलंगणा) येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा अभ्यास दौरा दि. ३१ ऑगस्ट २०२६ ते ०३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, उच्च शिक्षण संस्थांची कार्यपद्धती कळावी आणि तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळावी, यासाठी ‘Study Trip for Students to Higher Institutions Within & Outside State’ अंतर्गत ही विशेष मोहीम राबवली जात आहे.

दौऱ्याचे नियोजन व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना

 उपस्थिती व प्रस्थान: निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत जिल्हा स्काऊट भवन (बस स्टँड समोर, बीड) येथे उपस्थित राहावे.

 परतीचा प्रवास: अभ्यास दौरा पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दि. ०३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजता जिल्हा स्काऊट भवन, बीड येथून पालकांच्या व मुख्याध्यापकांच्या स्वाधीन केले जाईल.

 पालक संमतीपत्र: या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे रीतसर लेखी संमतीपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

 हंगामी काळजी: सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी सोबत छत्री अथवा रेनकोट तसेच वैयक्तिक वापराचे आवश्यक साहित्य सोबत बाळगावे.

 जबाबदारी: विद्यार्थ्यांना नियोजित वेळेत उपस्थित करणे व परत घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.

अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची तालुकानिहाय यादी

१. प्राथमिक विभाग (२२ विद्यार्थी)

 अंबाजोगाई: विवेक नामदेव माळी, श्रेयस नंदकिशोर रिटनकर (जि.प.प्रा.शा. वरपगाव)

 आष्टी: शिवांश संदीप गव्हाणे, अद्विक उमेश खंडारे (जि.प.कें.प्रा.शा. कडा क्र. १)

 बीड: कार्तिक कल्याण सांगळे, समाधान अशोक सांगळे (जि.प.प्रा.शा. ताडसोन्ना)

 धारूर: रितेश राजेंद्र इरमले, सोहम संतोष चव्हाण (जि.प.प्रा.शा. चोरंबा)

 गेवराई: रणवीर राजाभाऊ जायगुडे, विजय ताराचंद पवार (जि.प.उ.प्रा.शा. दिमाखवाडी)

 केज: ठोंबरे गिरीष सुभाष, चाटे श्लोक संजय (जि.प.प्रा.शा. तांबवा)

 माजलगाव: अशांक नागेश बेद्रे, पृथ्वी रामेश्वर शिंदे (जि.प.उ.प्रा.शा. छत्रबोरगाव)

 परळी: शिवम गोविंद मुंडे, हरी ओम विठ्ठल मुंडे (जि.प.उ.प्रा.शा. टोकवाडी)

 पाटोदा: सर्वेश अतुल पवार, सोहम अमोल राऊत (जि.प.उ.प्रा.शा. जरेवाडी)

 शिरूर (का.): सोहम सतीश दुधाळ, शिवम दादाराव शिंदे (जि.प.मा.शा. खोकरमोहा)

 वडवणी: आडे साई कैलास, लांडे अशोक विठ्ठल (जि.प.उ.प्रा.शा. सोन्नाखोटा)

२. माध्यमिक विभाग – विद्यार्थिनी (१४ विद्यार्थिनी)

 अंबाजोगाई: आनंदी शिवराज राऊत (जि.प.मा.शा. राडी)

 आष्टी: गळगटे वैष्णवी श्रीकृष्ण (जि.प.मा.शा. ह.ना. आष्टी)

 बीड: पुजा रामा खंडारे (जि.प.मा.शा. कारेगव्हाण)

 धारूर: पांचाळ अक्षरा जालिंदर (जि.प.मा.शा. हिंगणी बु.)

 गेवराई: अक्षरा सखाराम पिंगळे (जि.प.मा.शा. उमापूर)

 केज: कल्याणी बापूराव चौरे (जि.प.मा.शा. नाहोली)

 माजलगाव: तनुजा हनुमंत कोल्हे, दिपाली दिगंबर शेळके (जि.प.मा.शा. कन्या माजलगाव)

 परळी: नियती गणेश खिरे, नेहा देवराव भरड (जि.प.मा.शा. पोहनेर)

 पाटोदा: श्रेया संजय राख, संजिवनी विष्णु राख (जि.प.मा.शा. थेरला)

 शिरूर (का.): संचिता सदाशिव शिंदे (जि.प.मा.शा. खोकरमोहा), तळेकर विद्या सोमनाथ (जि.प.मा.शा. फुलसांगवी)

३. माध्यमिक विभाग – विद्यार्थी (८ विद्यार्थी)

 अंबाजोगाई: विवेक विकास जाधव (जि.प.मा.शा. राडी)

 आष्टी: कोल्हे समर्थ तुकाराम (जि.प.मा.शा. ह.ना. आष्टी)

 बीड: देवदत्त संजय खंडारे (जि.प.मा.शा. कारेगव्हाण)

 धारूर: बचुटे समीर रामराव (जि.प.मा.शा. हिंगणी बु.)

 गेवराई: आदित्य अशोक हरारे (जि.प.मा.शा. उमापूर)

 केज: तेजस तानाजी देशमुख (जि.प.मा.शा. नाहोली)

 शिरूर (का.): अनिकेत अभिमन्यु नागरगोजे (जि.प.मा.शा. खोकरमोहा), हिंदोळे युवराज बंडू (जि.प.मा.शा. फुलसांगवी)

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना राज्याबाहेर जाऊन विज्ञान, अंतराळ संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, यासाठी हा उपक्रम अत्यंत दिशादर्शक ठरणार आहे. या निवडीबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button