Uncategorized

केज येथे बॅच-२००४ चे उत्साहात पार पडले वार्षिक स्नेहसंमेलन व गेट-टुगेदर; शालेय आठवणींनी उजळले चेहरे!

केज (प्रतिनिधी):-भूतकाळातले मित्र-मैत्रिणी खूप वर्षांनी एकत्र आल्यावर बालपणीच्या जुन्या आठवणींना जशी उजाळा मिळतो, तसाच आनंददायी व भावनिक सोहळा केज येथे नुकताच अनुभवास आला. केज येथील ‘अर्जुन पॅलेस’ (अंबाजोगाई रोड, केज) येथे बॅच-२००४ चे वार्षिक स्नेहसंमेलन व गेट-टुगेदर कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. पहिल्या ते बारावीपर्यंत एकत्र शिकलेल्या मित्रांनी बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा भेटत आपल्या बालपणाची शाळा आणि जुन्या दिवसांची मैफिल पुन्हा अनुभवली.
“भूतकाळातले मित्र-मैत्रिणी, खूप वर्षांनंतर भेटू लागले, उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे वाटू लागले…” या सुंदर भावनेने भारलेल्या या कार्यक्रमात सर्व मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील गमती-जमती, किस्से आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यावर दिलखुलास गप्पा मारल्या.
या स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन मोहसीन शैख, अजित सोनवणे, महेश इंदानी, उदय सोनी, गणेश घृले, मनोज वाकळे, अशोक लोंढे आणि रविकिरण कोकीळ यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले होते.
कार्यक्रमाची शान वाढवण्यासाठी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती. यामध्ये हनुमंत भोसले सर, कदम सर आणि हनुमंत सोदागर सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गुरुजनांच्या उपस्थितीत झालेल्या या स्नेहसंमेलनाने कार्यक्रमाची गोडी आणखी वाढवली. शिक्षकांनीही आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
बऱ्याच वर्षानंतर शालेय मित्रांची झालेली ही भेट आणि जुन्या आठवणींचा झालेला उजाळा यामुळे उपस्थितांचे चेहरे आनंदाने व समाधानाने फुलून गेले होते. शेवटी पुन्हा लवकरच भेटण्याचा संकल्प करत या गेट-टुगेदरची सांगता करण्यात आली.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button