केज:-येथील कदमवाडी फाटा परिसरात दोन गटांतील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या एका हॉटेल चालकाचा चाकू भोसकून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विलास घुले असे मृत हॉटेल चालकाचे नाव आहे. या घटनेमुळे केज शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, संतप्त नातेवाईकांनी मारेकऱ्यांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला, तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन वेळा ‘रस्ता रोको’ आंदोलन केले.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, २० जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कदमवाडी फाट्यावरील ‘हॉटेल गावकरी’चे मालक विलास घुले हे आपला दोस्त उमेश माने सह हॉटेलवर थांबलेले होते. याच वेळी एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड यांच्यासह त्यांचे नातेवाईक तेथे आले. अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्यांनी हॉटेलमधील उमेश माने याला मारहाण करण्यास सुरुवात केली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी उमेश माने केजच्या दिशेने पळाला. त्याला वाचवण्यासाठी हॉटेल मालक विलास घुले आणि नितीन घुले हे त्याच्या पाठीमागे धावले.
भररस्त्यात गाठून जीवघेणा हल्ला पळून जाणाऱ्या उमेश माने यांना आरोपींनी समर्थ बिअर बारजवळ गाठले. बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम गायकवाड, भैय्यासाहेब गायकवाड, अजय उर्फ बंकट कदम, नवनाथ कदम, दीपक कदम आणि संतोष कदम यांनी उमेश माने यांना घेरून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद टोकाला गेल्यानंतर बाबासाहेब कदम याने सोबत आणलेला तीक्ष्ण चाकू थेट उमेश मानेच्या दिशेने घूसवला पन विलास घुलेने स्व:ताच्या पोटावर वार झेलला हे तेथील असलेल्या सि.सि.कॅमेरे मधे कैद झाले आहे या उपचारादरम्यान विलास घुलेचा मृत्यू झाला
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विलास घुले यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, २१ जून रोजी दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
केज शहरात तणाव, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
हॉटेल चालकाच्या मृत्यूची बातमी समजताच केज परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. कायदा व व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली युसुफवडगाव, धारूर आणि नेकनूर येथून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवून शहरात तैनात करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलीस फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल
आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा
जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका
जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल