सामाजिक

एका दल्लिदराने चक्क नगरपंचायतच्या मालमत्तेवरच दरोडा टाकला मुख्याधिकारी गाढ झोपेत

गोरगरिबांच्या घरावर दरोडा आता नगरपंचायतच्या मालमत्तेवर राजरोस दरोडा

केज :- नगरपंचायत मध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगणमताने केलेला घरकुल घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. महाराष्ट्रामध्ये घरकुल घोटाळ्याची चर्चा सुरू असताना लोकप्रतिनिधी व अधिकारी मात्र बेफिकीर असून केज शहराला पाण्याचे मोठे संकट असतानाही कसल्याही प्रकारची हालचाल करताना दिसत नाहीत.
केज नगरपंचायत मध्ये मागच्या काही दिवसांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून कोट्यावधी रुपयांचे घोटाळे केले. गोरगरिबांच्या घरकुलांचे आलेले पैसे परस्पर उचलून मलिदा लाटला आणि याचे पडसाद विधानसभेमध्ये उमटले. आमदार नमिता मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता घोटाळ्याची चौकशी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत सुरू आहे. मात्र एकीकडे हा घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असताना याची कसलेही सोयरसुतक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना राहिलेले नाही. शहरांमध्ये मागच्या दोन महिन्यांपासून रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कधी लाईट बिल न भरल्यामुळे तर अनेकदा पाईपलाईन नादुरुस्त झाल्यामुळे शहरवासीयांना निर्जळीचा सामना करावा लागतो.यामध्ये लोकप्रतिनिधी आपल्या सोयीनुसार मताच राजकारण करतात आणि अधिकारीही त्याच लोकप्रतिनिधींच्या इशाऱ्यावर चालतात. शहरांमध्ये बहुतांश भागामध्ये अद्यापही नळ योजना पोहोचलेली नाही. सुमारे ४० ते ५० टक्के रहिवाशांना उन्हाळ्यामध्ये विकतच्या पाण्यावर गुजराण करावी लागते. निवडणूक आली की मोठे मोठे आश्वासन दिले जातात आणि काही उमेदवार एखाद दुसरे बोर घेतात आणि मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशाच एका निवडणुकीच्या दरम्यान मागच्या काही वर्षांपूर्वी केज शहरातील उमरी रोड वरील गणेश नगर भागामध्ये एक बोर घेतले होते आणि त्यावर हातपंप टाकला होता. मात्र काही दिवसातच तो हातपंप नादुरुस्त झाला आणि पाण्याचा स्त्रोतही बंद पडला. मात्र मागच्या दोन वर्षांपासून एका दल्लिदर रहिवाशाने खाजगी मालमत्ता असल्यासारखे त्या बोअरवर असलेला नादुरुस्त हातपंप काढून टाकला आणि स्वतःची मोटार बसवली आणि चक्क एकट्यापुरतेच त्याबोअरला सीमित केले. सदरील भागामध्ये पूर्णपणे नळ योजना नादुरुस्त झालेली आहे. पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर भटकंती करावी लागते आणि त्या बोअरला पाणी असूनही एकच रहिवासी त्या बोअरचा गैरफायदा घेतोय. या प्रकरणी अनेकदा नगरपंचायत कडे तोंडी तक्रार केली मात्र याची दखल न घेतल्यामुळे मागच्या दोन महिन्यांपूर्वी सदरील भागातील रहिवाशांनी मुख्याधिकारी यांना लेखी तक्रार केली. मात्र मुख्याधिकारी श्री.धोपे यांनी अद्याप पर्यंत कसल्याही प्रकारची त्यावर कारवाई न करता फक्त राजकारण्यांसारखे आश्वासन देत राहिलेले आहेत. लोकप्रतिनिधींना मतांचे राजकारण करायचे आहे मात्र मुख्याधिकारी हे शासनाने नेमलेले असतात त्यांचे काय ? त्यांच्यावर कुणाचा दबाव येतोय का ? असा साधा प्रश्न रहिवाशांना पडलेला आहे. दोन महिन्यांमध्ये किमान वीस ते पंचवीसवेळा मुख्याधिकारी धोपे यांना यासंबंधी विचारणा करण्यात आली मात्र त्यांनी कसल्याच प्रकारची कारवाई केलेली नाही. प्रत्येक वेळेस आज करतो उद्या करतो अशा प्रकारचे राजकारणी उत्तरे देऊन रहिवाशांना वेड्यात काढण्याचे काम मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे सदरील प्रश्न त्यांच्या अधिकारात जर येत नसेल असे वाटत असून आता रहिवाशी जिल्हाधिकाऱ्याकडे दोन दिवसांत लेखी तक्रार करून दाद मागणार आहेत.
एवढेच नव्हे तर सदरील प्रभागाच्या ज्या नगरसेविका आहेत आणि ज्यांचा कारभार त्यांचे पुत्र पाहतात त्यांच्याकडेही आणि नगराध्यक्ष यांच्याकडेही अनेकदा तक्रारी करण्यात आल्या असून कसल्याच प्रकारची कारवाई झालेली नाही.नगरपंचायतीच्या मालकीच्या बोअरवर चक्क एक रहिवासी कब्जा करतो आणि लोकप्रतिनिधी आणि मुख्याधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेऊन अन्य रहीशांना पाण्यासाठी भटकंती करायला लावत असतील आणि विकासाच्या निव्वळ वल्गना करत असतील आणि हे कुणाला कळत नाही असे वाटत असेल तर हा गोड गैरसमज लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी काढून टाकावा.
दरम्यान केज नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी यासाठी शेकापचे भाई मोहन गुंड यांनी मागच्या पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दुसरीकडे घरकुल घोटाळ्याची चौकशी सुरू आहे एवढ्या सर्व घडामोडी घडत असताना  मुख्याधिकारी किती निगरगट्ट वागत आहेत याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button