सामाजिक

नंदकिशोर काकाजींचा शब्द अन् आमदार नमिताताईंचा पाठपुरावा! २५ गावांच्या चक्रातून केजच्या रुग्णालय परिसराची कायमची सुटका

नमिताताई मुंदडा व काकाजी मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश; केजमधील वीज समस्या कायमची संपली!

क्रांतीसूर्य न्यूज नेटवर्क (केज)
केज: शहराचा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या उपजिल्हा रुग्णालय परिसरातील व्यापारी, गॅरेज चालक आणि नागरिकांची गेल्या १० वर्षांपासूनची वीज समस्येची मुख्य अडचण अखेर दूर झाली आहे. केज मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. नमिताताई मुंदडा आणि ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर (काकाजी) मुंदडा यांच्या तत्परतेमुळे व महावितरणच्या माध्यमातून या भागाला स्वतंत्र वीजपुरवठा बहाल करण्यात आला असून, या ऐतिहासिक कामामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
२५ गावांच्या चक्रातून सुटका, प्रश्न कायमचा मार्गी
गेल्या दहा वर्षांपासून उपजिल्हा रुग्णालय परिसराचा वीजपुरवठा हा ग्रामीण भागातील गावठाण वाहिनीशी जोडलेला होता. या एकाच वीज वाहिनीवर तब्बल २५ गावे अवलंबून होती. त्यामुळे ग्रामीण भागातील कोणत्याही एका गावात तांत्रिक बिघाड झाला किंवा वीज गुल झाली, तर केज शहरातील या महत्त्वाच्या भागाचा वीजपुरवठा सलग एक ते दोन दिवस खंडित राहायचा.
हा भाग केज शहरातील व्यावसायिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. येथे मोठे गॅरेज, व्यापारी प्रतिष्ठाने आणि इतर दुकाने आहेत. सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे येथील व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता, तसेच रुग्णालय परिसरात येणाऱ्या नागरिकांचीही मोठी गैरसोय होत होती. गेली १० वर्षे या भागातील नागरिक या समस्येशी लढा देत होते.
काकाजींच्या पुढाकाराने महावितरणला तातडीचे आदेश
ही गंभीर समस्या जेव्हा केज मतदारसंघाच्या आमदार सौ. नमिताताई मुंदडा आणि समाजसेवक नंदकिशोर (काकाजी) मुंदडा यांच्या निदर्शनास आली, तेव्हा त्यांनी तातडीने यावर पावले उचलली. काकाजींनी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ या भागाचा प्रत्यक्ष सर्व्हे करण्याचे आदेश दिले. व्यापाऱ्यांचे नुकसान आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन हा प्रश्न तात्काळ सोडवण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
‘टाऊन नंबर वन’शी जोडली वीज; व्यापाऱ्यांकडून आभार
आमदार नमिताताई मुंदडा यांच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर काल मोठे यश आले. महावितरणने युद्धपातळीवर काम करत या परिसराचा वीजपुरवठा ग्रामीण वाहिनीवरून हटवून केज शहरातील ‘टाऊन नंबर वन’ या मुख्य वाहिनीशी जोडला.
दहा वर्षांपासून रेंगाळलेला हा अत्यंत क्लिष्ट प्रश्न सुटल्यामुळे काल वीजपुरवठा सुरळीत होताच या भागातील व्यापारी बांधव आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. अनेक वर्षांची डोकेदुखी कायमची संपवल्याबद्दल स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी आमदार सौ. नमिताताई मुंदडा आणि नंदकिशोर काकाजी मुंदडा यांचे जाहीर आभार मानले आहेत.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button