सामाजिक

किट्टी आडगाव चे सरपंच रुख्मांगद खेत्रे यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा – केज तालुका सरपंच परिषदेची मागणी

केज:- दि.२३ दोन दिवसापूर्वी माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव चे सरपंच रुख्मांगद खेत्रे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून सदरील रक्कम ही सरपंच यांनी सदरील रक्कम ही स्वतःसाठी घेतली नाही तर विहीर मंजुरीसाठी जे अधिकारी पैसे मागतात त्यांना देण्यासाठी घेतली होती यात त्यांचा काहीही दोष नसल्याने त्यांना या गुन्ह्यातून मुक्त करावे अशी मागणी केज तालुका सरपंच परिषदेच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर वृतांत असा की दोन दिवसापूर्वी माजलगाव तालुक्यातील कीट्टी आडगाव चे सरपंच रुख्मांगद खेत्रे यांनी विहीर मंजुरीसाठी लाभार्थी यांचेकडून पैसे घेतल्याचे प्रकरण घडले परंतु हे पैसे सरपंच यांनी स्वतःसाठी घेतले नाहीत तर वरिष्ठ अधिकारी विहीर मंजूर करण्यासाठी २५ ते ३०  हजार रु. मागतात मग ही रक्कम सरपंच कोठून देणार सदर लाभार्थी यासाठी ही रक्कम देतात परंतु ही रक्कम सबंधित अधिकारी सरपंच किंवा उपसरपंच किंवा रोजगार सेवक यांच्या माध्यमातून स्वीकारता आणि त्यासाठीच त्यांनी ही रक्कम स्विकारली यामध्ये वैयक्तिक त्यांची काहीही चूक नसून त्यांना या गुन्ह्यातून मुक्त करण्याची मागणी केज तालुका सरपंच परिषदेच्या वतीने तहसीलदार यांना करण्यात आली आहे. यावेळी तालुक्यातील सर्व सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button