कृषी

शेतकऱ्यांच्या मदतीला भाई मोहन गूंड मैदानात

शेतकऱ्यांना फसवणारे दुकानदाराची खैर नाही भाई मोहन गुंड

केज:- खरीप पेरणीची तयारी सुरु झाली आहे, शेतकरी बांधव बी-बियाणे चांगल्या प्रतिच्या खरेदीसाठी धावपळ करत आहेत, यापूर्वी अनेक दुकानाच्या बियाणे बोगस निघाल्यामुळे अनेक शेतकर्याचे पेरलेले बियाणे उगवलेच नाही आता या पेरणीच्या सुरुवातीलाच सावधगिरी म्हणून, खत बी-बियाणे घेताना शेतकऱ्यांनी पक्के जि. एस. टी. बिले कृषी दुकानदाराकडून घ्याव्यात असे आवाहन भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते भाई मोहन गुंड यांनी केले आहे.

मागील वर्षी खताचा तुटवडा दाखवून बेसुमार भावाने खत विक्री केल्याच्या घटना समोर आल्या होत्या, यावर्षी ही अनेक शेतकऱ्यांनी अनेक कृषी दुकानदाराच्या तक्रारी माझ्याकडे फोन द्वारे केलेल्या आहेत, मी दोन दिवसात जिल्हा कृषी अधिकाऱ्याची भेट घेणार आहे, मागील वर्षी सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्यामुळे दुबार पेरणीची वेळ आली होती. पक्के बिले नसल्यामुळे कृषी दुकानदार नंतर शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल घेतली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी दुकानदाराकडून पक्की पावती घेतल्याशिवाय खत बी बियाणे खरेदीच करू नये, खत बियाण्याच्या एम.आर.पी. पेक्षा अधिक पैसे दुकानदाराला देऊ नका.

दुकानदार खत बी-बियाण्याचा तुटवडा करीत असेल अधिक पैसे मागत असतील तर या नंबर वर 9423979492 संपर्क करा असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button