शैक्षणिक

जिल्हा परिषद सोनीजवळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावले पाच गोल्ड मेडल आणि पाच सिल्व्हर मेडल

केज :-जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनिजवळा, शाळेतील इ .इयत्ता दुसरी ते सहावीच्या एकूण 25 विद्यार्थ्यांनी एमटीएस ओलंपियाड -2025 या राज्यस्तरीय परीक्षेत यावर्षी प्रथमच सहभाग घेतला होता . यापैकी पाच विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल तर पाच विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल मिळवून उत्तुंग यश प्राप्त केले आहे . तसेच उर्वरित पंधरा विद्यार्थीही उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत . या पदकविजेत्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज शाळेत आयोजित करण्यात आला होता .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. हनुमंत गायकवाड आणि प्रमुख अतिथी म्हणून समितीचे उपाध्यक्ष श्री प्रवीण मस्के तसेच पी.एस.आय. कु स्वरूपा नाईकवाडे, दैनिक सामनाचे पत्रकार श्री. सुंदरराव नाईकवाडे यांनी स्थान भूषविले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, विद्यार्थी ,गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
प्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यानंतर मुख्याध्यापक श्री . गुंड सर यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले . अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पाच गोल्ड मेडल आणि पाच सिल्वर मेडल सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले . तसेच परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण प्रमाणपत्र वितरत करण्यात आले . विशेष म्हणजे यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांचाही शाल आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला . कार्यक्रमात पीएसआय कु .स्वरूपा नाईकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पेन आणि चॉकलेट भेट स्वरूपात दिले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री . सावंत सर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीम. पवार मॅडम यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती नवले मॅडम, गिरी मॅडम, श्री .काळे सर, सांगळे सर ,दौंड सर आणि जावळे सर , यांनी परिश्रम घेतले .
विद्यार्थ्यांच्या या यशाचे सरपंच सौ. जान्हवीताई गोविंद ससाने, उपसरपंच स्वातीताई दादासाहेब कोकाटे , व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आणि पत्रकार श्री . दशरथ चौरे यांनी कौतुक केले आहे .

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button