राजकारण

ईश्वर मुंडेच्या हातात ना.अजित (दादा) पवारचे घड्या़ळ

केज/धारूर :-बीड जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी पदावर नौकरी करून खा.शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून स्वेछा सेवानिवृत्ती घेतलेल्या प्रा.ईश्वर मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धारूर तालुकाध्यक्ष,ओबसी सेल प्रदेश सरचिटणीस व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सेल प्रदेशाध्यक्ष या पदांवर प्रभावीपणे कार्य केले.
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आ.प्रकाशदादा सोळंके यांच्या विजयात प्रा.ईश्वर मुंडे यांचा मोलाचा वाटा होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर प्रा.ईश्वर मुंडे यांनी खा.शरदचंद्र पवार यांच्यासोबत राहणे पसंद केले.
खा.शरदचंद्र पवार साहेब व आ.जयंतराव पाटील साहेब यांच्या संम्मतीने प्रा.ईश्वर मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ लढविण्यासाठी बीड जिल्ह्य़ात जन संपर्क वाढवला होता परंतू शेवटच्या टप्प्यात खा.बजरंग बप्पा सोनवणे यांचा पक्षात प्रवेश झाल्याने प्रा.ईश्वर मुंडे यांना माघार घ्यावी लागली होती.
या वेळी प्रा.ईश्वर मुंडे यांनी समाजाचा रोष पत्करून पक्षाचे उमेदवार खा.बजरंग बप्पा सोनवणे यांचा प्रचार केला होता.
नंतर प्रा.ईश्वर मुंडे यांनी विधानसभा निवडणुक २०२४ साठी माजलगाव मतदारसंघाचा निवडणुक पुर्व जन संपर्क दौरा पूर्ण केला होता. या वेळेला ही श्री मोहनराव जगताप यांचा पक्षात प्रवेश झाल्याने प्रा.ईश्वर मुंडे यांना संधी मिळाली नाही.
या नाराजीने प्रा.ईश्वर मुंडे यांनी माजलगाव विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवून रंगत आनली होती परंतू शेवटच्या टप्प्यात आ.जयंतराव पाटील यांच्या विनंतीवरून खा.सुप्रीयाताई सुळे यांच्या माजलगाव येथील जाहीर प्रचार सभेत पक्षाचे उमेदवार श्री.मोहनराव जगताप यांना पाठींबा देवून त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले होते.
आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजलगाव मतदारसंघ व बीड जिल्ह्य़ात प्रमाणीक पणे केलेले काम खा.शरदचंद्र पवार साहेब व आ.जयंतराव पाटील साहेब यांना वास्तव सांगणारे मोठया मनाचे नेतृत्व बीड जिल्ह्य़ात नसल्यामुळे व पक्ष संघटनेपेक्षा स्वत:ची मानसे निर्माण करण्याचे राजकारण बीड जिल्ह्य़ात सुरू असल्यामुळे आपण खा.शरदचंद्र पवार साहेब यांना सोडून जड अंत:करणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर आबा चव्हाण यांच्या विनंतीवरून श्री रमेशराव आडसकर यांच्यासोबत वानखडे स्टेडियम, मुंबई येथे ना.अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ना.अजितदादा पवार,खा.सुनीलराव तटकरे यांच्या हस्ते पक्षात प्रवेश केला असल्याचे प्रा.ईश्वर मुंडे यांनी केज येथील पक्ष नोंदणी कार्यक्रमात आपल्या भाषणात सांगितले.
पुढे बोलताना प्रा.ईश्वर मुंडे म्हणाले की,रमेशराव आडसकर हे कार्यकर्त्यांना पद व प्रतिष्ठा मिळवून देणारे नेते आहेत या मुळे आपण त्यांच्या नेतृत्वाखालील पक्ष वाढीचे काम करून सर्व नव्या जुन्यांना सोबत घेऊन जन हिताची कामे करत राहणार आहोत.
या वेळी स्टेजवर श्री रमेशराव आडसकर,ॲड.राजेश्वर आबा चव्हाण,.ऋषिकेश आडसकर, श्री.राजाभाऊ औताडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button