सामाजिक

सोनिजवळा येथे खंडोबा यात्रेचे आयोजन

कामासाठी बाहेरगावी गेलेले युवक,जेष्ठ मंडळी सहभागी होतात

 

केज:-दर वर्षीप्रमाणे याही वर्षी सोनीजवळा गावकरी मंडळी तर्फे चंपाषष्टी निमित्त खंडोबा यात्रेचे नियोजन सोमवार २, डिसेबर ते शनिवार ७, डिसेंबर केले आहे यात्रेनिमित अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी भावीकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी सोनीजवळा यांचे मार्फत करण्यात आले आहे यात्रेतील कार्यक्रम पुढील प्रमाणे, शुक्रवार दि ६, डिसेंबर रोजी सायंकाळी ८ ते ११ या वेळी अमोलराजे म्युझीकल नाईट आ र्केस्ट्रा यांचा बहारदार कार्यक्रम होईल शनिवार दि.७, डिसेंबर रोजी सायंकाळी ८ ते ११ जय मल्हार वारू ग्रुप पार्टी, तसेच गावकरी मंडळी तर्फे भव्य मिरवणूक होईल, दुपारी ४ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होईल संध्याकाळी ७, वाजता शोभेची दारु उडवण्याचा कार्यक्रम होईल व नंतर सायंकाळी ८, वाजता सुप्रसिद्ध शिवमल्हार जागरण पार्टी यांचा वाघ्या मुरळी चा कार्यक्रम होईल तरी पंचक्रोशीतील सर्व भावीकभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक, समस्त गावकरी मंडळी सोनीजवळा ता. केज यांचे कडून करण्यात आले आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button