राजकारण

विजयी, पराभुत उमेदवार लागले हिशोबाच्या कामाला मताधिक्क न देणारे पुढारी चिंतेत

पैसे घेऊन मतदान न करणारे पुढारी वाढले

केज :- केज विधानसभेची निवडणुक अत्यंत चुरशीची झाली मतदान मोजणी आज पर्यत अशी होईल हे कधीही कुनाला वाटले नव्हते मताधिक्क हे १० हजार पर्यत कुनाचेही गेले नाही पन निवडणुक ही स्वता:ला आत्मपरिक्षण लावणारी होती कुनावर किती विश्वास टाकुन काम करायचे हे मतदारानी दाखवुन दिले पहीले राजकारण करताना गावात सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचे नेते आपल्या मर्जीतले एक दोन कार्यकर्ते आसायचे पन ती परिस्थिती राहिलेली नाही

आज नेतेमंडळीने सांभाळलेल्या कार्यकर्ते स्व:ताच्या सोयीनुसार नेत्याचे कान भरलेले दिसतात त्यांचा प्रत्यय हा निवडणुकीत दिसुन येतो अन तेव्हा नेत्याला वाटते की आपन या गावासाठी काय कमी केले नाही मग मतासाठी दारोदार का जावे लागते पन गावात वेगळीच परिस्थिती आसते जो नेतेवर भरोसा ठेऊन आसतो तो कधिही गुत्तेदार नसतो उमेदवारी मागत नसतो तो कधी मतदानावेळी पैसे मागत नसतो पन हे कानफुके मंडळीमुळे निवडणुकीमधे नेतेना त्रास सहन करावा लागतो हा काळ संपला आहे आता नेते मंडळीनी आपले कानफुके कार्यकर्ते ही व्याख्या संपवली पाहीजे आता आपले गाव नागरीक माझे या व्याख्याने कारभार केला पाहीजे आज पर्यत पैसे घेतले की आपले काम करतो ही भुमिका संपली पाहीजे पैसे न घेताही स्वाभिमानाने पन काही जन उमेदवाराचे काम करत आसतात तेच विजयाची सलामी देत आसतात आज जे गावात दोन चार पुढारी दुकान टाकुन बसलेले आसतात ते बोबाटा करणारे दोन चार व्यक्तीला पैसे देऊन आपन किती उमेदवाराला मदत करत आहेत हे दाखवुन देण्यात पटाईत आसतात पन ही वस्तुस्थिती नसते नेत्यांनी चांगले काम केलेले आसते त्यावर मत केलेले आसते पन श्रेय हे गावपुढारी घेऊन घर भरत आलेले आसतात आता मतमोजणी झाली आहे हिशोबाच्या पट्टीवर आलेल्या नेतेमंडळीवर हात मारावा त्यावर यांना समजेल या दुकानदार नेते मंडळीनी आपल्याला किती मताधिक्क दिले यावर यांचे वजन बघावे अन आपलाच कारभार सुधारुन घ्यावा नाही आपले पाढेपच्चावन्न चलु द्या अन यांच्या म्हणन्यानुसार माणसे आडवा माणसे जिरवा

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button