शैक्षणिक

केज तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ संघ केज यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक जनजागृती शिबिर संपन्न

स्वामी विवेकानंद शाळेत शिबीर संपन्न

 

केज:-: दि. २७ नोव्हेंबर- जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक विभाग या शाळेमध्ये संविधान दिनाचे औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती तसेच विधीज्ञ संघ केज यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. के. डी. जाधव, जिल्हा व अती, सत्र न्यायाधीश केज हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये श्री. एल. बी. बेडसकर, गटशिक्षणाधिकारी केज श्री. ए. एस. राठोड, सहा. गटविकास अधिकारी केज ॲड. डी. टी. सपाटे, ॲड. ए. जे. देवधारे, ॲड. एस. एन. मुंडे, ॲड. एस. व्ही. मिसळे व विधीज्ञ सदस्य तसेच  संस्थेचे  सचिव गिन्यानदेव गदळे सचिव, जीवन विकास शिक्षण मंडळ केज, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिवनंदा मुळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड. डी. टी. सपाटे यांनी केले. संविधान दिना विषयी माहिती सांगताना ते म्हणाले, भारतीय राज्यघटनेने आपल्याला अधिकारच नव्हे तर कर्तव्यही दिले आहे तेंव्हा विद्यार्थ्याचे प्रथम कर्तव्य देशाची प्रगती साधने व सामाजिक बांधिलकी जपणे.

ॲड. देवधारे यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या कायदेशीर सेवा युनिट विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले, मुलांच्या हक्कावर येणारे बाधा दूर करण्यासाठी हे युनिट स्थापन केले आहे. मुलांवर अन्याय झाल्यास ते न्यायालयात येऊन हक्क व अधिकाराबद्दल माहिती घेऊ शकतात.

ॲड. मुंडे यांनी मुलांसाठी बालस्नेही कायदेशीर सेवा आणि त्यांचे संरक्षण योजना व मुलांचे हक्क या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिले, संविधानातील कलम ३२ नुसार आपण आपल्या अधिकाराचे संरक्षण करू शकतो, कलम १५ भेदभावापासून संरक्षण, कलम ४५ व ४७ बालकांच्या संदर्भात कायदे करण्याचे न्याय व्यवस्थेला मार्गदर्शन करते.

पोलीस उपनिरीक्षक श्री. राजेश पाटील यांनी याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर क्राईम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मोबाईलचा वापर मर्यादित व योग्य कारणासाठी केला पाहिजे, तसेच कोणतेही ॲप घेताना ते व्हेरिफाइड आहे का नाही हे तपासले पाहिजे. यामध्ये हॅकिंग, डिवाइस कंट्रोल, फिशिंग, आयडेंटिटी थिफ्ट, अशा क्राइम ला आपण नाहक बळी पडतो. तेव्हा लिंक ओपन न करणे, ओटीपी न सांगणे तसेच डिवाइसला स्ट्रॉंग पासवर्ड लावणे, व सॉफ्टवेअर नेहमी अपडेट करणे इत्यादी काळजी आपण घेतली पाहिजे.

याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री. बेडसकर हे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा ( आर टी ई ) हा भारतीय संसदेचा ४ ऑगस्ट २००९ रोजी लागू केलेला कायदा आहे, ज्यामध्ये ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या महत्त्वाच्या पद्धतींचे वर्णन केले आहे. तसेच मुलांच्या समस्या व उपाय याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.

ॲड. मिसळे याप्रसंगी म्हणाले, कोणत्याही औषधांचा वापर जास्त प्रमाणात करू नये, त्याचे दुष्परिणाम गंभीर स्वरूपात होऊ शकतात, सध्या आपल्या देशात नशामुक्त भारत योजना सुरू करण्यात आलेली आहे.

अध्यक्षीय समारोपात केज येथील न्यायाधीश श्री. के. डी. जाधव म्हणाले, आपल्या देशाच्या संविधानाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते हस्तलिखित आहे. संविधानाने भारतीय नागरिकांना जीवन जगण्यासाठी हक्क तसेच व्यक्तीगत स्वातंत्र्यही दिली आहेत. संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता ही बहुमूल्य तत्वे दिली. तसेच शिक्षणाचाही अधिकार दिला आहे. पूर्वीच्या काळी स्त्रियांचे जीवन अत्यंत दयनीय होते. त्यांचे जीवन चोल आणि मूल या उक्तीप्रमाणे सीमित होते. परंतु आता मुलगी शिकली प्रगती झाली हा विचार आपण स्वीकारला आहे. म्हणून आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने कार्य करताना दिसत आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रबोधकांत समुद्रे यांनी केले, तर आभार श्री. अजय देशपांडे सर यांनी मानले.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button