संपादकीय
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय नेत्या पंकजाताई मुंडे हे दोघे मोठे नेते आहेत त्यांच्यावर चिखलफेक करु नका
मनोज जरांगे पाटील व पंकजाताईनी संयम ठेवावा बीड जिल्ह्यात जातीयवादा मुळे परीस्थिती गंभीर होत आहे

बीड :- लोकसभेचा निकाल झाल्यापासुन मराठा वंजारी वाद भयानक परीस्थितीच्या वळणावर येऊन ठेपला आहे या दोन्ही बाजुचे युवका एकमेकाचे नेते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील किंवा सौ पंकजाताई मुंडे या दोघावर एकमेकाचे सोशलमिडीया विर एकमेकाच्या नेत्यावर अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरून आपल्या अंधभक्ताची ओळख देत आहेत पन हे मुठभर सोशलमिडीया शूरविर चार भिंतीत बसुन आपल्या बुद्धीचे ज्ञान पाजळत आहेत त्यांनी एक लक्षात ठेवावे तुम्ही म्हणजे पुर्ण समाज नाहीत आज ही गावोगावी मराठा व वंजारी बांधव एकमेकासाठी मदतीला धावुन येतोय सर्व काही राजकारणासाठी समाज जगत नसतो अन ही नेतेमंडळी कुनाच्या घरचे कुटुंबाची काळजी घेत नसतात आपल्या कुटुंबाची काळजी आई वडीलच घेत आसतात त्यांनीच तुम्हाला शिकवण्यासाठीच पोटाला एकवेळ भाकर न खाता तुम्हा शिकवत आहेत मग तुम्ही शिकलात तेही कुनाच्या आई बहीनीला शिव्या द्यायला का?
आज तुमच्या आई बहिनीला वडिलाना कुनी शिव्या दिल्यावर कसे वाटेल



