राजकारण

केज राखीव मतदार संघात शरद पवार गटात आमदार पदासाठी इच्छुकांची रस्सीखेच

शरद पवार गटाकडुन पृथ्वीराज साठे,गोकुळ जाधव, रमेश गालफाडे,अंजलीताई घाडगे,संगिताताई ठोंबरे यांचा मागणीमधे समावेश

केज:- केज राखीव मतदार संघामधे विधानसभेची निवडणुक जवळ येत आहे तसे तसे आमदार होण्यासाठी शरद पवार गटाकडुन उमेदवारी मिळावी यासाठी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवने यांच्याकडे संपर्क वाढवला आहे केज मतदार संघाची भौगलीक परीस्थिती पाहता त्यामधे तीन तालुके येतात केज संपुर्ण तालूका बीड तालुक्यातील काही गावे व अंबाजोगाई मधील काही गावाचा समावेश आहे या मतदार संघाची विकास बाबत २०१४ ते २०१९ पर्यत भाजपच्या माजी आमदार सौ. संगिताताई ठोंबरे या आमदार होत्या त्यांच्या काळात केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत होता त्या काम करत आसताना अनेक ठिकाणी वादग्रस्त निर्णयामुळे विद्यमान आमदार आसताना त्यांना उमेदवारी नाकारली काही केज मधील काही अंबाजोगाई येथील जनमत नसलेल्या लोकांच्या गराड्यात राहून अधोगती करुन घेतली त्यांना राजकीय अनुभव नसल्यामुळे त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ही लोक आता त्या(राजकीय)संकटात पाच वर्ष त्यांनी मतदार संघ चालवला ते आज संगिताताई ठोंबरे सोबत दिसत नाहीत
त्यांनी या लोकापुढे मतदान करणारे मतदाराना वार्यावर सोडुन दिले परिनामी आज त्यांच्या सोबत पे लोक सोबत घेऊन फिरण्याची वेळ आली
२०१९ ते२०२४ हा काळ फार बदलला आहे याकाळात राज्यात सर्व पक्ष सत्तेत होते त्यांचा फायदा रास्ते तिर्थविकास सभाग्रह यांचा विकास झालेला आहे त्यामधे मराठा आरक्षणामुळे भाजप सरकारवर मराठा समाज नाराज आसुन त्यांचा फटका महाराष्ट्रात बसणार हे निश्चीत दिसत आहे म्हणुनच शरद पवार गटाकडे इच्छुकांची प्रचंड गर्दी झालेली दिसुन येते पक्षीय राजकारणाचा फटका हा विद्यमान आमदारांना बसु शकतो जर वैयक्तीक आमदार हे स्वच्छ प्रतिमेचे आहेत त्यांनी काम करत आसताना विकासाबाबत वैयक्तीक कोणाची हानी केल्याचे दिसत नाही
माजी आमदार पृथ्विराज साठे हे मतदाराच्या संपर्कात आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केज पोलीस स्टेशन व इतर बरेच कामे केलेली आहेत
बाकी उमेदवार हे निवडणुक जाहीर झाली की सक्रिय होतात निवडणुक संपली की गायब होतात ही वस्तुस्थिती आहे मग केज मतदार संघातील मतदाराने सक्रिय कामे करणारे आमदाराना निवडुन द्यायचे की गायब होणारे उमेदवार निवडुन द्यायचे हे ठरवावे लागेल

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button