राजकारण

शरद पवारांचं नाव घेत नाही तोपर्यंत किंमत राहत नाही’, जितेंद्र आव्हाड यांचा छगन भुजबळ यांच्यावर घणाघात

 

“महाराष्ट्राच्या राजकारणात जोपर्यंत शरद पवार यांचे नाव घेत नाही तोपर्यंत आपली काही किंमत राहणार नाही हे सर्वच महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना माहिती आहे. मंत्री छगन भुजबळ त्यात फार हुशार आहेत”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली मंत्री छगन भुजबळ यांनी सर्वपक्षीय बैठकीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबद्दल मोठा दावा केला. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला होता. शरद पवार यांनी बारामती येथून फोन केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला, असा दावा छगन भुजबळ यांनी केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणात जोपर्यंत शरद पवार यांचे नाव घेत नाही तोपर्यंत आपली काही किंमत राहणार नाही हे सर्वच महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना माहिती आहे. मंत्री छगन भुजबळ त्यात फार हुशार आहेत. सगळ्या उच्चवर्णीय समाजातून विरोध असताना शरद पवारांनी पहिल्यांदा क्रांतीकारक निर्णय घेतला आणि मंडळ आयोग सुरू केला हे मान्य आहे की नाही? ज्या शरद पवारांनी आयोग सुरू केले ते शरद पवार का अडवतील?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

“ज्या पद्धतीने तुम्ही एकमेकांवर तुमच्याच पक्षात आरोप करताय, छगन भुजबळ यांनी किती वेळा निर्देश केलाय की, कोण करते कोण करते याचा? ओबीसींचा बजेट, एससीचं बजेट, एसटीचा बजेट एका फटक्यात कधीतरी ग्राह्य झालं आहे का? आमचा एकत्रित निर्णय झाला. इतक्या वेळा बैठका घेतल्या. आम्हाला कधी सांगितलं की चला बैठकीला? काय सुरू आहे याची चर्चा केलीत का?”, असादेखील सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

“महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा आहे की महाराष्ट्रावर परिणाम करणारी राजकीय आणि सामाजिक अडचण आली तर विरोधी पक्ष आणि सरकार एकत्र बसतात आणि मार्ग काढतात. मात्र तुम्हाला तसं काही करायचं नव्हतं. तुम्हाला फक्त आगी लावायच्या होत्या”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

तुम्ही वैयक्तिक फोन केलात, पण…’
“आम्हाला काही कोणाचा फोन वगैरे आला नाही. शरद पवारांना या सगळ्यापेक्षा महत्त्वाची कामे आहेत. तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला फोन केलात का? जयंत पाटलांना फोन केलात का? प्रतोद म्हणून मी आहे. पण तुम्ही वैयक्तिक फोन केलात. पण सरकारतर्फे फोन आला नाही. वैयक्तिक फोन करताना देखील तुम्ही जितेंद्र ओबीसींची बाजू आपल्याला लावून धरायची आहे, यासाठी केला होता. ओबीसी विरुद्ध मराठा हे झुंझवण्याची मला इच्छा नाही. मी हे पहिल्यापासून सांगितलं आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

‘त्यादिवशी शरद पवार कुठे होते हे तुम्हाला माहिती आहे का?’
“पहिल्या दिवसापासूनच मी सांगितलं होतं की, हे सरकार ओबीसी विरुद्ध मराठा ही भांडणं लावून देण्याचं काम करत आहे. बाकी त्यांची कुठलीही इच्छा नाही. त्यांचा सामाजिक सुधारणा हा उद्देश नसून राजकारण हा उद्देश आहे. छगन भुजबळ यांसारख्या प्रगल्भ विचाराच्या नेत्यांनी हे इतकं बालिश सारखं बोलणं शोभत नाही. 5 वाजता बारामतीहून फोन आला असे स्टेटमेंट तुम्ही करता. त्यादिवशी शरद पवार कुठे होते हे तरी तुम्हाला माहिती आहे का?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

‘भुजबळ साहेब बोलताना थोडा विचार करत जा’
“खरंतर मला छगन भुजबळ आणि विरुद्ध बोलायला फारसे आवडत नाही. कारण मला पहिले तिकीट त्यांनी मिळवून दिले आहे. भुजबळ साहेब बोलताना थोडा विचार करत जा, कारण नसताना मनात राग निर्माण होईल. आम्ही स्वातंत्र्य बुद्धीचे आहोत. आणि आमचे विचार मांडू शकतो आणि मी तर पहिल्या दिवसापासूनच हे सांगतोय की हे राज्य सरकार झुंज लावण्याचे काम करत आहे. तुम्ही एका विरोधात एक अशी भांडण लावतात”, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button