शैक्षणिक

शिक्षक भैरु दामोधर चौधरी यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवराची उपस्थिती

केज :- शहरातील स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर,उमरी रोड केज येथील शिक्षक श्री.भैरु दामोधर चौधरी हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.संस्थेच्या व शाळेच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा तथा निरोप समारंभ शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.ॲड. राजेसाहेब देशमुख यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भुषविले. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवरामपुरी मठ संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.भगवान महाराज वरपगावकर व सहाय्यक संचालक मा.डॉ.अशोकराव थोरात यांची उपस्थिती होती.तर प्रमुख उपस्थितीत
संस्थेचे अध्यक्ष राहूल देशमुख, सचिव जी. बी. गदळे, कोषाध्यक्ष सय्यद नवाबसाहेब, सह सचिव अशोकराव डांगे, संचालक शहाजी देशमुख, सामाजिक कार्यकर्ते प्रा.हनुमंत भोसले, शाहू बँकेचे व्यवस्थापक सर्जेराव जाधव उपस्थित होते.
सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देतांना मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात सर्व मंचावरील मान्यवर, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांचा सहभाग होता, यावेळी उपस्थित विद्यार्थी भावूक झालेले दिसले. सत्काराला उत्तर देताना सत्कारमुर्ती चौधरी बी.डी.यांनी आपल्या तीस वर्षांचा प्रदिर्घ यशस्वी कारकिर्दीचा लेखाजोखा आपल्या मनोगतातून मांडला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे बी.बी, यादव व्ही.बी,देशमुख ए.डी,क्षीरसागर आर.एस,डिरंगे जी. बी,मस्के जे.आर,भालेराव मॅडम व जाधव मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचलन यादव व्हि.बी.तर आभार शाळेच्या मु.अ.श्रीमती चाटे बी.बी. यांनी मानले. कार्यक्रमासाठी चौधरी सरांचा पूर्ण परिवार, नातेवाईक, हितचिंतक, शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर व आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते. सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button