राजकारण

संविधानापुढे अहंकारचा थरकाप

शहजादे राहुल गांधी

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी विसरणार नाहीत..कदाचीत त्यांच्या आयुष्यातील हे छायाचित्र सर्वात दु:खद क्षणाचे साक्षीदार असू शकते..
फार दिवस नाही झाले
अगदी काही दिवसांपुर्वीच गोदी मिडिया टोळीतील एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत
कोण राहूल गांधी?
असा तुच्छतादर्शक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.. राहूल गांधी कोण आहेत याची ओळख आज पंतप्रधानांना नक्की झाली असेल..
वयानं नरेंद्र मोदी नक्कीच ज्येष्ठ आहेत..
परंतू लोकसभा सदस्य म्हणून राहूल गांधी नरेंद्र मोदी यांना सिनियर आहेत.. नरेंद्र मोदी 2014 ला पहिल्यांदा लोकसभा सदस्य झाले.. राहूल गांधी त्या अगोदरच सभागृहाचे सदस्य झालेले आहेत..
तरीही कोण राहूल गांधी?
ही अहंकाराची भाषा ?
राहूल गांधींची ओळख नसलेल्या मोदी यांना, त्यांना बरोबर घेऊनच स्पिकर ओम बिर्ला यांना आसनापर्यत न्यावं लागलं..
भारतीय लोकशाहीची ही ताकद आहे..
भल्या भल्यांचा अहंकार लोकशाहीनं संपविला..
आज मोदींचा अहंकार ही गळून खाक झाला असेल..
राहूल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपनं गेल्या दहा वर्षात काय काय नाही केलं?
जराही कसर सोडली नाही..
“पप्पू” म्हणत त्यांच्या राजकीय क्षमतेबद्दलच संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला..
“शहजादे” म्हणत त्यांची थट्टा केली..
झारखंडच्या एका रॅलीत त्यांनी विरोधी पक्ष नेता होण्याएवढी दहा टक्के खासदारही त्यांच्याकडं असणार नाहीत असं सांगून त्यांना किरकोळीत काढलं. ..
त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचा खेळ खेळला गेला..
कॉंग्रेस मुक्त भारतची घोषणा तर जुनीच आहे.. ..
देशात विविध ठिकाणी त्यांच्यावर 22 गुन्हे दाखल केले गेले..
हा सर्व छळ राहूल गांधींनी सहन केला..
ते थकले नाहीत, हरले नाहीत, नाऊमेद झाले नाहीत..
दोन यात्रांच्या माध्यमातून आपण एक परिपक्व राजकारणी आहोत , मोदी आणि भक्त म्हणतात तसे रणछोडदास नाहीत हे जगाला दाखवून दिलं..
स्पिकरचं अभिनंदन करताना त्यांनी आज
जे भाषण दिलं ते अप्रतिम होतं,
ते पप्पू नाहीत, पक्के राजकारणी
आहेत हे दाखवून देणारं होतं..
ओम बिर्ला यांचं अभिनंदन करतानाच
तटस्थ राहा, भेदभाव करू नका, प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याची वेळ द्या, असं सांगत स्पिकरला त्यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली..
नेहमी टी शर्ट, जीन्स मध्ये दिसणारे राहूल गांधी आज झब्यात होते..
विरोधी पक्ष नेते म्हणून उठून दिसत होते..
अब हवा बदल रही है!

डी एम देशमुख
मराठी पत्रकार संघ

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button