सामाजिक
आगीत तेल ओतण्यापेक्षा नेते मंडळीनी शांततेचे आवाहन केले पाहीजे
एका पोष्ट मूळे नांदूर मधे मराठा वंजारी समाजामधे दगडफेक
केज :- तालूक्यामधील नांदूर येथील अमोल जाधव यांनी फेसबूक वर एक पोष्ट वायरल केली अन वंजारी समाजातील नांदूर च्या आसपास असेलेली १० ते १५ गावातील वंजारी समाजातील तरून नांदूर गावावर चाल करून आले नंतर मराठा समाजातील इतर गावातील व नांदूर येथील तरून या दोन्ही समाजात प्रचंड प्रमाणात एकमेकावर दगड फेक करण्यात आली व पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून जमाव पागवला व रात्री उशीरा नेत्याच्या दबावाखाली येऊन मराठा तरूणावर गंभीर गून्हे दाखल केले ही एकतर्फी कार्यवाही ही बीड जिल्हा कोणत्या वळणावर जात आहे हे वेळीच सर्व पक्षीय नेत्यांना कळणे गरजेचे आहे त्यांनी दोन्ही समाजात आग लावण्याचे काम न करता सलोख्यांचे वातावरण निर्माण केले पाहीजे
४ तारखेला मतदान मोजणी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजाच्या नेते मंडळीनी शांततेचे आवाहन केले पाहीजे
मतदारानी ज्या उमेदवाराला आर्शीवादरूपी मतदान केले आहे तो उमेदवार निवडून येणार आहे त्यामूळे दोन्ही समाजातील तरूणानी शांत रहावे



