संपादकीय

वरमाई सिंदळ आसल्यावर वराड काय करील

मतांच्या राजकारणासाठी केज शहरावर बुलडोझर फिरवा

केज :- केज तालुका हा शांत संयमी म्हणून ओळखला जात होता पण आता हा तालुका मागील काही वर्षांपासून अनेक घटनांनी बदनाम झालेला आहे त्यामधे खुन, अपहरण,हाफ मर्डर, बलात्कार, दररोज होणारे खोटे विनयभंग शासकिय जागेवर दिवसाढवळ्या दरोडा टाकून पक्के बांधकाम करीत आहेत तालुक्यातील खेडोपाड्यातील जनता तहसिल कार्यालय समोर दहा पाच दिवसांनी अनेक मागण्यांसाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला जातो केज शहरात विविध ठिकाणी मटाका पत्ते जुगार स्पॅा सेंटर (लेडिज मसाज) सेंटर उघडले आहेत केज शहरात विविध ठिकाणी गुन्हेगार मोटारसायकल चोरली जाते अन् त्यांच्या दलाला मार्फत संपर्क साधला की पाच हजार दिले की मोटारसायकल मिळुन जाते केज शहरातील विविध ठिकाणी अनाधिकृत बॅनर लावले जातात त्यावर कुनाचेही नियंत्रण नाही शहरात एक जरी गाडी आडवी लावली तरी एक दोन किलोमीटरच्या रांगा लागतात मग सर्व या गोष्टीला तहसिल कार्यालय,पोलीस प्रशासन जवाबदार आहे का?
नागरीकांच्या काही जवाबदारी नाहीत का?
योग्य ठिकाणी पार्किंग करावी गावामधे उत्सवात वर्गणी मागुन बॅनर झेंडे लावले तर नगरपंचायतीच्या तोंडाकडे न बघता आपले थोबाडाचे बॅनर सन्मानाने स्वताहून खाली काढून घ्यावे अतिक्रमणात दुकान टाकले तरी स्व:ताची तरी गाडी रस्त्यावर लावु नये केज मधे मोठे दोन महामार्ग गेलेले आहेत त्यांच्या दिशादर्शक फलकावर आपले थोबाडाचे बॅनर लावायला फलके केलेली नाहीत हे भान ठेवावे प्रवास करणारे लोकांना त्यांचा किती त्रास होतो हे बघने केज शहरातील नागरिकांचे काम आहे यापुढे पोलीस प्रशासनाने अश्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांची धिंड काढली पाहिजे जेने करुन गुन्हा करायला धजवणार नाहीत.

केज शहरातील विविध पक्षांच्या नेत्यांनों मतांच्या राजकारणासाठी केज शहरावर बुलडोझर फिरवा

आज शहरातील नागरिक कोणतेही नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे पाण्याचा अपव्यय बेशिस्त पार्किंग दिसेल तेथे अतिक्रमण केजडीच्या पुलावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण घरी कुत्रे मांजरी पाळायच्या अन् रस्त्यावर घाण टाकायची अनाधिकृत बांधकामे बेमाप करायची नगरपंचायत काहीही कुनावरही कधीही कार्यवाही केली नाही कारण यांना मत पाहिजे आसतात म्हणुन तेरी भी चूप अन् मेरी भी चूप असा कारभार केज शहराचा चालु आहे कुनीही यावे अन् टपली मारुन जावे.नगरपंचायत प्रशासनाने बेशिस्त बेकायदेशीर बांधकाम करीत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करायलाच पाहिजे मतांच्या राजकारणासाठी केज शहराचे तिन तेरा वाजलेत अशी कार्यवाही करायची नसेल तर केज शहरावर बुलडोझर फिरवा
केज तालुक्यातील जनतेला नविन आलेले सहाय्यक पोलीस अधिक्षक व्यंकटराम यांच्या पासुन सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमावत साहेबासारखी अपेक्षा आहेत गुन्हेगारीला आळा बसेल हे नागरिकात बोलले जात आहे त्यानुसार काल त्यांनी कोणतेही अवैध गतिविधि खपवून घेतल्या जाणार नाहीत हे त्यांनी पत्रकार परिषदेत माहीती दिलेली आहे..

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button