संपादकीय

विचारांची मशाल शिक्षकांच्या हाती; हास्य क्लबने साजरी केली अनोखी भिमजयंती.

केज: प्रतिनिधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, केज शहरातील ‘हास्य क्लब’च्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील विवेकानंद माध्यमिक विद्यालयात शहरातील विविध माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना सन्मानपूर्वक निमंत्रित करून त्यांना ‘संविधान’ प्रत भेट देण्यात आली. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा शिक्षण क्षेत्रात अधिक दृढ व्हावा, या हेतूने हा कार्यक्रम पार पडला.
मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन:
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद शिंदे (काका) हे होते, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गदळे सर यांनी केले. याप्रसंगी हास्य क्लबचे सदस्य प्रविण देशपांडे ,थोरात सर, शिवकुमार मस्के सर, दादा जमाले (पाटील), आनिल सत्वधर, रामहरी नाना गुंड, राऊत दादा, गणेश तपसे, अभिजीत सत्त्वधर, सुरेश सुतवसे, विलास सोनवणे आणि यांची  प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित निमंत्रित पाहुणे:
या सोहळ्याला केज शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये भोसले सर (पत्रकार), सौदागर सर (रामराव पाटील विद्यालय), कविता कराड मॅडम (साने गुरुजी विद्यालय), नंदू मस्के सर (नालंदा विद्यालय), मुंडे मॅडम (स्वामी विवेकानंद विद्यालय), औटी सर (शारदा इंग्लिश स्कूल), जकी शेख सर (कराड विद्यालय), अशोक मस्के सर (पवनराजे इंग्लिश स्कूल), इनामदार सर (वसुंधरा मा. विद्यालय), ढाकणे सर (जीवन शिक्षण मा. विद्यालय), शेंडे सर (वसंत विद्यालय) आणि देशमुख सर (जय भवानी कन्या प्रशाला) यांचा समावेश होता.
यशस्वी आयोजन:
कार्यक्रमाचे अतिशय नेटके सूत्रसंचालन समुद्रे सर तर आभार प्रदर्शन दत्त्ता सत्वधर  सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेकानंद माध्यमिक शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचारी वृदांने विशेष परिश्रम घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना साजेल अशा या वैचारिक उपक्रमाचे केज शहरात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button