
१,२०० कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या नवीन संसद भवनाच्या लाॅबीमध्ये प्लॅस्टिकच्या बादल्या ठेवल्यात. कशासाठी माहिती आहे का? तर संसद भवन गळतंय!
राम मंदिर ही गळकं आहे. अयोध्येत वाट्टेल तशी बांधकामे करुन अयोध्येची वाट लावली. तीच अवस्था दिल्लीची केलीये. पुणे-मुंबई आणि नागपूर मध्ये तोच पॅटर्न राबवला. त्याचे परिणाम जनतेने यंदा भोगले आहेत. यापुढे नेहमीच भोगायचे आहेत.
गेल्या १० वर्षांत बांधलेल्या कोणत्याही रस्त्यावर जा, तिच अवस्था आहे जी रस्ते बांधकाम करण्याआधी होती. मग हा सगळा अट्टहास केला कशासाठी? तर इलेक्टोरल बाँड च्या माध्यमातून कंत्राटदारांकडून बक्कळ पैसा कमावण्यासाठी! आणि कंत्राट दिल्यानंतर, कंत्राटदारांकडून स्थानिक कार्यकर्त्यांना कमिशनची बिदागी मिळावी म्हणून!!
गेल्या १० वर्षांत सर्वाधिक भ्रष्टाचार रस्ते बांधणी आणि सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात झाला आहे.



