केज:-बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांत विनाकारण खोटे आणि बोगस गुन्हे दाखल करण्याचे पेव फुटले होते. मात्र, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या कडक आदेशानंतर आणि केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनउने यांच्या निस्पृह कारभारामुळे केज परिसरातील खोट्या गुन्ह्यांचे सत्र पूर्णपणे बंद झाले आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता केवळ कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी आता केजची जनता खंबीरपणे उभी राहिली आहे.
आक्रोष मोर्चाच्या आडून पोलिसांना टार्गेट करण्याची धडपड:
गेल्या काही दिवसांत केजमध्ये विलास घुले खून प्रकरणात आक्रोष मोर्चा काढून पोलीस निरीक्षक स्वप्निल उनउने यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याची केविलवाणी धडपड काही घटकांकडून सुरू आहे. केवळ आपल्या मनाप्रमाणे खोटे गुन्हे दाखल होत नाहीत किंवा अटक होत नाही पण पोलिसांवर दबाव आणता येत नाही, म्हणूनच हा मोर्चा काढून प्रामाणिक अधिकाऱ्यावर चिखलफेक केली जात असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे. मात्र, पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशानुसार, कोणत्याही दबावाला बळी न पडता पुराव्याशिवाय खोटे गुन्हे दाखल करणे किंवा विनाकारण अटक न करण्याच्या निर्णयावर पोलीस प्रशासन पूर्णपणे ठाम आहे.
गुन्हेगारांवर सीसीटीव्हीची ‘करडी नजर’ आणि कडक कारवाई:
गुन्हेगारांना थेट हर्सूलचा रस्ता: तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढणार नाही याची चोख व्यवस्था करत, पीआय उनउने यांनी तब्बल ४ ते ५ सराईत गुन्हेगारांवर झोपडपट्टी कायद्यांतर्गत (MPDA) कडक कारवाई करून त्यांची थेट हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे: केज शहरातील मुख्य चौक आणि वर्दळीच्या सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यामुळे छुप्या मार्गाने गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्यांवर आणि टवाळखोरांवर पोलिसांची चोख नजर आहे.
डीजे/डॉल्बीमुक्त मिरवणुका: महापुरुषांची जयंती असो वा देवदेवतांचे उत्सव, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ‘डॉल्बी’ आणि डीजे संस्कृतीला त्यांनी केज शहरात पूर्णपणे लगाम लावला आहे.
आता ‘त्या’ ५ गुन्हे असणाऱ्यांची खैर नाही; पोलीस अधीक्षकांकडून यादी मागवली!
केज परिसरातील गुन्हेगारी मुळासकट उपटून टाकण्यासाठी पोलिसांनी आता पुढील धडक मोहीम हाती घेतली आहे. ज्या गुन्हेगारांवर ५ किंवा त्याहून अधिक गुन्हे नोंद आहेत, अशा आणखी ४ ते ५ सराईतांवर पुन्हा एकदा झोपडपट्टी कायद्यांतर्गत (MPDA) कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. या कारवाईसाठी पात्र असणाऱ्या अशा सर्व गुन्हेगारांची संपूर्ण माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्वतः मागवून घेतली आहे.
खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचे मनसुबे उधळले!
गेल्या १० वर्षांपासून बीड जिल्ह्यात किरकोळ कारणांवरून किंवा आकसापोटी बोगस गुन्हे नोंदवून सर्वसामान्यांना त्रास देण्याची प्रवृत्ती वाढली होती. पोलिसांनी या प्रवृत्तीला पूर्णपणे चाप लावल्यामुळे ज्यांचे ‘दुकान’ बंद झाले आहे, अशे काही हितसंबंधी लोक आता जाणीवपूर्वक पोलिसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत.
कोणताही गुन्हा करणारा व्यक्ती मग तो कोणीही असो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. परंतु, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर विनाकारण चिखलफेक केली, तर त्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम होऊन केजची शांतता धोक्यात येऊ शकते. गुन्हेगारांना थारा न देता, सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या केज पोलीस ठाण्याच्या संपूर्ण टीमला केजमधील जनतेचे मोठे पाठबळ मिळत असून, “तुम्ही कोणत्याही दबावाला बळी न पडता निःपक्षपणे तुमचे कर्तव्य बजावत राहा, जनता तुमच्या पाठीशी आहे,” असा विश्वास तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.
क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल
आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा
जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका
जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल