क्राईम

अखेर खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड व विष्णु चाटे अडकले

केज पोलीसानी गुन्हा दाखल केला

फिर्याद दिनांक ११.१२.२०२४

विभाग (कलम)

१ )भारतीय न्याय संहिता २बी एन एस), २०२३  ३०८(२)

२)भारतीय न्याय संहिता (वी एम एस), २०२३ ३०८(३)

३)भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ ३०८(४)

४)भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ ३०८(५)

५)भारतीय न्याय संहिता (बी एन एस),२०२३३(५)

मी सुनिल केंदु शिंदे वय ४२ वर्षे व्यवसाय खाजगी नौकरी, रा. व्दारका रेसिडन्सी, उपनगर पोलीस ठाणेचे मागे, व्दारका, नाशील रोड, नाशीक ह.मु. मोंढा रोड, बीड ता. जि.बीड मो. नं.७३०३०९३०४५ समक्ष विचारले वरुन पोलीस ठाणे केज येथे हजर येऊन तोंडी सांगतो की, मी मी वरील ठिकाणचा राहणार असुन

मागील ०१ वर्षापासुन अवादा एनर्जी प्राव्हेट लिमीटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहे. माझ्याकडे बीड जिल्हयातील केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन उर्जा प्रकल्पाचे मांडणी व उभारणीचे काम आहे. मस्साजोग या ठिकाणी प्रकल्पाचे मुख्य कार्यालय असुन, त्या ठिकाणी माझे सोबत विविध प्रकल्पाचे अधिकारी काम पाहत आहेत. माझे सहकारी शिवाजी नाना थोपटे हे जमीन अधिग्रहण विभागाचे काम पाहतात, आमचे पवन उर्जा प्रकल्पाचे प्रमुख म्हणून श्री. सतिष कुमार हे महाराष्ट्रात काम पाहतात.

दिनांक २९.११.२०२४ रोजी १०. वा सुमारास मी मस्साजोग येथील अवादा एनर्जी प्रकल्पाचे कार्यालयात हजर असतांना माझे मोबाईल क्रमांक ७३०३०९३०४५ वर विष्णु चाटे यांचा मोबाईल क्रमांक ९७६३७३६५७७ वरून फोन आला व त्यांनी मला वाल्मीक आण्णा बोलणार आहेत असे म्हणाले, आरे ते काम बंद करा, ज्या परिस्थीती मध्ये सुदर्शनने सांगीतले आहे, त्या परिस्थीतीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालु केले तर याद राखा असे म्हणून प्रकल्पाचे काम बंद करणे बाबत धमकी दिली. मी व शिवाजी थोपटे असे कार्यालयात हजर असतांना दुपारी ०२.३० वाजण्याचे सुमारास सुदर्शन घुले रा. टाकळी हा आमचे मस्साजोग येथील प्रकल्पाचे ठिकाणी आला व त्यांनी पुन्हा काम बंद करा, अन्यथा जी मागणी यापूर्वी केलेली आहे त्याची पुर्तता करा असे म्हणुन केज मध्ये चालु असलेल्या इतर ठिकाणाचे अवादा कंपनीचे सर्व काम बंद करा अन्यथा तुमचे हात पाय तोडुन तुमची कायमची वाट लावुन टाकील असे म्हणुन धमकी दिली होती. काही दिवसापुर्वी शिवाजी थोपटे यांना वाल्मीक आण्णा कराड यांनी त्यांचे परळी येथील कार्यालयात बोलावुन अवादा कंपनीचे केज तालुक्यातील सर्व काम बंद करा अन्यथा कांम चालु ठेवायचे असेल तर २ करोड रुपये द्या असे सांगीतले होते. त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईल वरून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहान करण्याच्या व जिवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. यापुर्वी दि. २८/ ०५/ २०२४ रोजी ११.०० वाजण्याचे सुमारास याच कारणावरून माझे आपहरण केलेले होते. त्या

बाबत मी पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिली होती. त्यावरून पोलीस ठाणे केज गु.र.नं. २८५/२०२४ गुन्हा दाखल आहे. तसेच दि.०६/१२/२०२४ रोजी देखील सुदर्शन घुले व इतर यांनी आवादा कंपनीचे मस्साजोग येथील प्रकल्पाचे ठिकाणी जबरदस्तीने प्रदेश करुन गेटवरील कामगारांना धमकी देऊन मारहान केली होती. त्यावेळी आमचे कंपनीचे शिवाजी थोपटे यांनी सुदर्शन घुले व इतर लोकांविरूध्द पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झालेला आहे.

तरी मी काम करत असलेल्या अवादा कपंनीचे केज तालुक्यातील पवन उर्जा प्रकल्पाचे काम बंद करण्यासाठी वाल्मीक कराड रा. परळी ता. परळी, विष्णु चाटे रा. कौडगाव ता. केज व सुदर्शन घुले रा. टाकळी ता. केज जि. बीड हे वारंवार प्रकल्पाचे काम चालु झाल्यापासुन धमकी देत आहेत. त्यामुळे मी त्याचे दहशती खाली असल्याने व माझी मनस्थिती बरोबर नसल्याने मी आमचे कपंनीचे वरिष्ठ पदाधिकारी यांचेशी चर्चा करुन त्यांचे सल्ल्याने आज रोजी उशिराने तक्रार देत आहे.ही फिर्याद दिली, ती संगणकावर टाईप करुन त्याची प्रिंट काढून ती मी वाचुन पाहिली असता ती माझे सांगणे प्रमाणे बरोबर व खरी आहे.

परळी हा बीड जिल्ह्याचा गुंडगिरीसाठी २०१९ ते आज पर्यत  केंद्रस्थानी राहीला  सर्व पक्षीय  खासदार आमदारानी तक्रार दिल्यावरच अखेर सुत्रधारावर कार्यवाही झाली

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button