राजकारण
केज मतदार संघात बंडखोर उमेदवार बळकट
बंडखोरीला लगाम घालण्यासाठी उमेदवारीची शरद पवार गटाची यादी लांबणीवर

केज:-केज मतदार संघात विधानसभेच्या उमेदवारी साठी राष्ट्रवादी कॉग्रेस (श.प.)कडे अनेक ईच्छुकांनी पायघड्या टाकलेल्या दिसतात क्रमवारी उमेदवार
१)श्री रोमन साठे
२)श्री.रमेश (तात्या )गालफाडे
३)माजी आमदार सौ.संगिताताई ठोंबरे
४)सौ.अंजली ताई घाडगे
५)सौ.मनिषा गोकुळ जाधव
हे सर्वच सर्व शरद पवार गटाकडुन केज विधान सभेसाठी तिकिट मागितले आसुन त्यांचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. हे गेली १५ दिवसापासुन काही जन गोविंद बाग बारामती तर काही जन मोदी बाग पुणे तर काही जन सिल्वर ओक येथे चकरा मारुन मारुन बेजार झाले तरी अजुन काही घोळ मिटेना. अन उमेदवारी काही मिळेना अशी गत उमेदवाराची झाली आहे. मतदार संघातुन कार्यकर्ते या भावी आमदारासाठी रसद पोहचता पोहचता नाकी नव आलेले आहेत. जे या पक्षाचे प्रामानीक आहेत. ते मात्र बिनधास्त आहेत पवार साहेबांनी जर यादी लवकर जाहीर केली. तर हे ईच्छुक उमेदवार हे अपक्ष म्हणुनच लढणार आहेत हे जवळपास निश्चित केलेले आहे.हे सर्व पक्षीय उमेदवार जे आहेत ते आमदार होण्यासाठी आटापिटा का करत आसतील यांचा प्रामुख्याने विचार केला तर हे जनतेच्या हिताचा विचार करत आसतील हे साफ खोटे आहे.
स्व:ताचा स्वार्थ समृद्धी मानसन्मान प्रापर्टी आमदाराची पेन्शन मोफत सर्व सुविधा या मोफत सुखसुविधा मिळण्यसाठी यांचा खटाटोप दिसुन येतो जनतेच्या मनात क्रांतीकारी विचार मनात घोळायचे जाती पातीचा गजर करायचा आपली पोळी एैन वेळी भाजुन निघते का ते बघायचे नंतर पाच वर्ष जनता जाए भाड मे पुढे निवडणुक आली की हाच खटाटोप
राजकिय लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपन केलेली स्वार्थी विचार हे जनतेला ग्रहीत धरुन काही कळत नाही हा तुमचा गैरसमज आहे .
जिथे तुमचे विचार संपतात तेथुन पुढे जनतेचे विचार चालु होतात हे लक्षात घ्यायला हवे



