राजकारण

इंदिरा गांधीं नावाच्या वाघीणीचा पंजा- आर. के. धवन

 

तरुण वाचकांना आर. के. धवन म्हणजे कोण हा प्रश्न पडण्याचीच शक्यता आहे. पण ज्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींची कारकिर्द बघितली असेल, त्यांना आर. के. धवन हे काय रसायन होते ते नक्कीच माहिती असेल.आर के धवन यांचे आयुष्य एक जबरदस्त सुपर ड्युपर बॉलीवूड बायोपीक बनवता येईल असे होते.१९६२ ते १९८४ मध्ये इंदिराजींचा मृत्यु होईपर्यंत पंतप्रधानांचा शंभर टक्के विश्वास असलेली आर. के. धवन ही एकच व्यक्ती होती. या कालखंडातला प्रत्येक क्षण ते पंतप्रधानांसोबत होते. बियांतसिंगने इंदिराजींवर गोळ्या झाडल्या तेव्हाही आर. के. धवन काही पावलेच त्यांच्या मागे चालत होते.आर. के. धवन केवळ योगायोगाने इंदिराजींच्या सहवासात आले.इंदिराजींना एका चांगल्या स्टेमो टायपिस्टची गरज होती.यशपाल कपूर नावाचे एक राजकारणी तेव्हा इंदिराजींचे निकटवर्ती होते. त्यांनी त्यांचा नातलग राजिंदरकुमार धवन यांची या कामी शिफारस केली.काही वर्षांतच आर. के. धवन इंदिराजींचे डोळे आणि कान बनले. यानंतरच्या काळात त्यांची ताकद इतकी वाढली, की राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनासुद्धा पंतप्रधानांना भेटायचे असेल तर आर. के. धवन यांच्यामार्फतच त्यांना जावे लागायचे. आएएस -आयपीएस अधिकारी कितीही मोठा असला तरी आर. के. धवन यांच्या परवानगी शिवाय पंतप्रधानांना भेटता यायचे नाही. अधिकार्‍यांच्या बदल्या, मंत्र्यांचे खातेपालट, सरकारी निर्णय, सरकारी फायलींचे अवलोकन, यासाठी एकच रस्ता होता तो म्हणजे आर. के. धवन !!
“पंतप्रधानांची अशी इच्छा आहे की…” असा आवाज फोनवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आला की त्यांना धडकीच भरायची. १९७२ नंतर अशी स्थिती होती की सरकार म्हणजे संजय गांधी, माखनलाल फोतेदार, सिध्दार्थ शंकर रे, आणि अर्थातच आर. के. धवन. अनेकांनी आर. के. धवन म्हणजे पंतप्रधानांचे डोअर किपर किंवा पॅलेस गार्ड अशी पण संभावना केली आहे. पण आर. के. धवन म्हणजे स्वामी निष्ठतेचा कळस असेच म्हणावे लागेल. कामात अडथळा नको म्हणून या गृहस्थांनी वयाच्या ७४ वर्षांपर्यंत लग्न पण केले नव्हते.
१९८४ साली इंदिराजींच्या अंगरक्षकांनी त्यांची हत्या केली. आर. के. धवन तेव्हा काही पावलेच त्यांच्यामागे चालत होते आणि त्यांना एकही गोळी लागली नाही हा धागा पकडून त्यांचा या हत्येत सहभाग होता असा आरोपही त्यांच्यावर आला. ठक्कर कमिशनने सुद्धा अशी एक शक्यता असू शकेल असे म्हटले आणि आर. के. धवन यांचे वाईट दिवस सुरु झाले. घराभोवती आयबीचा खडा पहारा सुरु झाला, फोन टॅप झाले, अनेक आरोप झाले. एकेकाळी दुखावले गेलेले सर्व पुढारी एकत्र आले. या संशयाच्या भोवर्‍यातून धवन यांनी स्वतःला बाहेर काढले, सावरले.. पण राजकारणातून अंग बाहेर काढून घेतले. राजीव गांधी सत्तेवर आल्यावर त्यांनी आर. के. धवन यांना तांदळातल्या खड्यासारखे दूरच ठेवले. पण राजीव गांधी गेल्यावर सोनिया गांधींना राजकीय आधाराची गरज भासली आणि अनमान न करता ते पुन्हा एकदा परत आले.
त्यांच्या मृत्युनंतर सगळे काही आता काळाच्या पडद्याआड जमा झाले आहे. पण आर. के. धवन यांचा उल्लेख इतिहासात इंदिरा गांधीं नावाच्या वाघीणीचा पंजाच असाच असेल.

बोबाटाच्या वॉलवरुन

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button