सामाजिक

राहुल गांधीनी निवडणुक आयोगावर फोडला अणुबॉब भाजपची उडाली दानादाण

निवडणुक आयेगाचे प्रवक्ते बनवुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी वर केली टिका

दिल्ली:- संसदेत भाषण करताना चारच दिवसापूर्वी मोदी शेठ राहुलकडे पाहात चेष्टायुक्त स्वरात म्हणाले होते :” या लोकांना जनता वारंवार का नाकारतेय ते त्यांना अजून का लक्षात येत नाही? ”
तर त्याच्या आदल्या दिवशी केंद्रीय ग्रहमंत्री नेहमीच्या नासक्या सुरात राहुल गांधीना उद्देशून म्हणत होते : ” २०२९ साली देखील तुम्ही त्याच ( म्हणजे विरोधी बाकावर ) जागी बसणार आहात. “

सत्तेतून आलेला दोघांचा असा उद्दामपणा कशाच्या जोरावर होता, तर त्यांनी EC च्या मदतीने चालविलेल्या अखंड मत चोरीच्या जोरावर… त्याची पोलखोल काल राहूलने काल जगासमोर केलीय.
🖤

भक्कम संघटन, अमित शाह चा चाणक्यगिरी, मोदींची लोकप्रियता, RSS चा सक्रिय पाठिंबा, कार्यकर्त्यांची मेहनत, लोकांची केलेली कामे ( म्हणजे विकास ), जगात वाढलेली प्रतिष्ठा ….
या सगळ्यातील फोलपणा काल नागडा झांला.
RSS /BJP ला गेली ११वर्ष मिळालेला पाठिंबा हा लोकप्रेमातून मिळत नव्हता, तर तो मतांच्या चोरीतून मिळवला जात होता, हे उघड झालंय.
🖤

या मतचोरीची तयारी संघ /BJP ने फार अगोदरपासून चालवली होती. त्यासाठी त्यांना ” असोशिएशन ऑफ बिलियन माईंड्स ” ही कंपनी मदत करत होती. ( गुगलवर तिची कुंडली मिळेल.)
BJP साठी फर्जी मतदार तयार करणाऱ्या या कपंनीची दिल्ली, गुजरात आणि हैद्राबाद येथे कार्यालये आहेत.

कंपनीने तयार केलेल्या बोगस मतदार यादीवर EC चे अधिकारी मान्यतेची मोहोर तात्काळ उमटवीत, हेच BJP च्या यशाचे गमक समजता येईल.

ममता दिदीने यांची चोरी पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कंपनी सावध झाली, पण BJP साठी काम करत राहिली.

गेली ११ वर्ष या कंपनीने भारतीय निवडणूक ही चेष्टेचा विषय बनविलाय, ही गंभीर बाब आहे.
🖤

या मतचोरीच्या घटनेत नैतिकता आणि देशप्रेमाचेडोस लोकांना वारंवार पाजणाऱ्या RSS सारख्या पाखण्डी देशभक्तांचेही पूर्ण वस्त्रहरण झालंय.( म्हणजे चड्डी सुटली.)

सामान्य जनता आपल्याला जवळ करत नाही, हे लक्षात आल्यावर येन केन प्रकारेन सत्ता मिळवण्यासाठी RSS ने २०१२-२०१३साली भ्रष्टाचारविरुद्ध (किसन हजारेला दुसरा गांधी बनवून ) आंदोलन उभं केलं.
आणि वर्षभरातच मोदी शेठ केंद्रातील सत्तासोपान चढले!

१०० वर्ष झालेल्या संघाच्या मूर्ख पंडितांना डिजिटल युगातही हिंदू राष्ट्राचं स्वप्न पडतंय. त्यासाठी त्यांना आपली माणसे सर्व मोक्याच्या जागी हवीत.शिवाय सत्ता देखील सुशेगात राहायला हवी!
मग देशभर हिंदू -मुसलमान, मशीद -मंदिराचा हमखास ध्रुवीकरण करणारा अजेंडा संघाने इमाने इतबारे चालवला.
आणी त्या आवरणाखाली मतांची चोरीदेखील लपवली जात होती.
🖤

पण राहुल गांधी ने काल संघ आणि bjp च्या बुडाखालीच बॉम्ब फोडलाय आणि एका अर्थी संविधानाचा गळा मोकळा केलाय!

त्याला साथ देणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य ठरतं, एव्हडेच!

****
मदन पाटील

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button