शैक्षणिक

विडा येथील विशाल घुटे याची सैन्यात लेफ्टनंट पदी निवड

केज:- विडा ( ता. केज ) येथील विशाल फुलचंद घुटे याची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदी निवड झाली आहे. एसएससी मार्फत घेण्यात आलेल्या मुलाखतीचा निकाल नुकताच घोषित झाला असून विशाल घुटे देशात 32 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

विडा येथील फुलचंद घुटे हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याचा मुलगा विशाल याला सैन्यात अधिकारी होण्याची महत्वाकांक्षा होती. त्यासाठी शालेय स्तरापासून त्याने पूर्व तयारी सुरू केली होती. विशाल याने प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शिक्षण केंद्रीय विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर नाशिकच्या के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन मध्ये त्याने बिटेक पदवी संपादन केली. सैन्यात 350 लेफ्टनंट ( टेक्निकल ) पदासाठी अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांमधून भरती प्रक्रिया राबवण्यात आली. देशभरातून जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातून 325 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून विशाल घुटे याने 32 वा क्रमांक पटकावला आहे. निवड झालेल्या उमेदवारांना गया याठिकाणी एक वर्षाचे प्रशिक्षण देऊन यशस्वी प्रशिक्षणानंतर त्यांना पोस्टिंग देण्यात येणार आहे.वडील फुलचंद घुटे यांचा देश सेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी विशाल हा सैन्यात दाखल झाला असून त्याच्या निवडीबद्दल आप्तस्वकियासह सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. विडा येथील गावकऱ्यांनी निवडी बद्दल त्याचे अभिनंदन करून पिता-पुत्राचा हृद्य सत्कार केला.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button